adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"स्वयंरोजगाराच्या संधी" ... श्री. मनीष लढे

  "स्वयंरोजगाराच्या संधी" ... श्री. मनीष लढे मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड  (संपादक -:-हेमकांत गायकवाड) कवयित्री बहिणाबाई चौधर...

 "स्वयंरोजगाराच्या संधी" ... श्री. मनीष लढे


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय ,,"मिशन सहासी अभियानाचा "आज २०/१२/२०२४ चौथा दिवस आजच्या पहिल्या सत्रात डॉ. सौ. प्रणिता सरोदे यांनी विद्यार्थिनींना योगा चे प्रशिक्षण दिले. यात विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रतिसाद दिला. 

दुसऱ्या बौद्धिक सत्रात मिशन सहासी अभियाना अंतर्गत लाभलेले श्री. मनीष लढे यांनी " स्वयम रोजगाराच्या संधी" या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी व त्यांचे सहकारी सत्यम राऊत, स्वतः चालू केलेल्या Supreats या स्टार्टअप बद्दल माहिती दिली. United world institute of Design येथून उच्च शिक्षण घेत असताना त्यांना मानांकित कंपनीतून आलेल्या IIT grades, Robokits, Crysalis, Nilons इत्यादी जॉब अपॉर्च्युनिटी न स्वीकारता स्वतःचे स्टार्ट अप तयार करून काहीतरी नवीन असे साध्य करणे हा त्यांचा हेतू घेऊन त्यांनी कॉलेज जीवनात Tryangle for T- shirt, Laakood, Miles for bike असे तीन स्टार्टअप चालू केले , यासाठी त्यांना गव्हर्मेंट कडून दोन लाखापर्यंतचे फंडिंग मिळाले परंतु ,त्यांना पाहिजे तसे यश आले नाही तरी खचून न जाता त्यांनी नव्याने सुपर इट हा चौथा स्टार्टअप चालू केला आणि त्यांना असा विश्वास आहे येणाऱ्या एका वर्षात त्यांनी सुरू केलेला व्यवसाय हा नक्कीच यशस्वी होईल व इतरांनाही त्यातून रोजगार मिळतील. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार कौशल्यनिर्मिती अभ्यासक्रमांवर भर देत आहे. ‘मेक इन इंडिया’ अथवा ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. संजीव साळवे विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा. डॉ. अतुल बढे सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा. सविता जावळे महिला विद्यार्थी विकास अधिकारी तसेच युवतीसभेचे सदस्या प्रा. डॉ. ताहिरा मीर, प्रा. डॉ. सुरेखा चाटे, प्रा. सीमा राणे यांनी परिश्रम घेतले.

No comments