पथदिवे बंद असल्याने हेदअंबा पाडा रात्रीला अंधारात.. फाईल चित्र त्र्यंबकेश्वर तालूका प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) केंद्र शासनाच्या ...
पथदिवे बंद असल्याने हेदअंबा पाडा रात्रीला अंधारात..
त्र्यंबकेश्वर तालूका प्रतिनिधी
फाईल चित्र
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या ईईएसएल या अधिकृत उपक्रमातून शहरांच्या ठिकाणी रस्त्यावर एलईडी दिवे बसवले जातात बसवलेल्या एलईडी दिव्यांची देखभाल- दुरुस्ती करणे संबंधित कंपनीला दिलेले असते.ग्रामीण भागामध्ये गावांमधील रस्त्यांवर ग्रामपंचायत अंतर्गत पथदिवे बसविले जातात व त्याची देखभाल दुरुस्ती ही ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात येत असते.त्यातच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे ग्रामपंचायत अंतर्गत हेदअंबा या पाड्यावरचे पथदिवे चार महिन्यापासून बंद होते त्यानंतर ऑक्टोबर महिन्या मध्ये हेदअंबा पाड्यावरच्या खांबावरचे पथदिवे दुरुस्ती करण्यात आले परंतु हे पद दिवे रात्रभर लागले आणि दुसऱ्या दिवशीच पथदिवे बंद झाले कारण या एलईडी प्लेट कमी वॅट व हलक्या दर्जाच्या असल्यामुळे जळून खराब होऊन गेले.त्या दिवसापासून आता दोन महिने होत आले पथदिवे बंद असल्याने हेदअंबा पाडा रात्रीला अंधारात आहे हेदअंबा परिसरात बिबट्याचे वावर असल्याने पाड्यावरचे नागरिक रात्रीच्या घराबाहेर निघण्यास घाबरत आहेत त्यामुळे पथदिवे संदर्भात ग्रामसेवक यांना वारंवार सांगूनही पथदिवे बसविण्यास जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे या पाड्याकडे गटविकास अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिक प्रतिक्रिया

No comments