श्री गणेश सार्वजनिक वाचनालयास अवधूत दामोदरे यांच्याकडून पुस्तके भेट ईदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) भुसावल सार्वजनिक वाचना...
श्री गणेश सार्वजनिक वाचनालयास अवधूत दामोदरे यांच्याकडून पुस्तके भेट
ईदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
भुसावल सार्वजनिक वाचनालयाचे सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदर यांच्याकडून न्हावी येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयास भारतीयांच्या हृदयातले सरदार वल्लभभाई पटेल, एक संघ भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल, आणि चंद्रग्रहण हे सीमा भारंबे लिखित तीन पुस्तके सप्रेम भेट देण्यात आली. त्यांनी ही पुस्तके श्री गणेश सार्वजनिक वाचनालयाचे सचिव युवराज तळेले व ग्रंथपाल ललित इंगळे यांच्याकडे सुपूर्त केले. प्रसंगी वाचनालयाचे संचालक ललित कुमार फिरके, भुसावळच्या सार्वजनिक वाचनालयाचे संचालक हरीश पाटील, ग्रंथपाल नितीन तोडकर व भुसावळच्या द. शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस पी पाटील उपस्थित होते.

No comments