कापसाला योग्य भाव नसल्याने कापूस उत्पादक संकटात कापसाला १० हजार रुपये भाव द्यावा...... संदीप पाटील, शेतकरी संघटना संदीप पाटील, शेतकरी सं...
कापसाला योग्य भाव नसल्याने कापूस उत्पादक संकटात
कापसाला १० हजार रुपये भाव द्यावा...... संदीप पाटील, शेतकरी संघटना 
संदीप पाटील,
शेतकरी संघटना
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्ह्यासह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कापसाचे वजन कमी झाले असून वेचनीच्या खर्च यंदाच्या हंगामात वाढला आहे कापसाला योग्य दर मिळत नसल्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे खरीप हंगामात जळगाव जिल्ह्यातील जवळपास ३ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती मात्र यावर्षी कापसाचे दर वाढले नसून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे.
राज्यासह यंदा सरासरी कापसाचे उत्पादन समाधानकारक झाले आहे बंदूक कापसाला मिळणारा दर अजूनही समाधानकारक नाही यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे साठवणूक केली आहे परंतु काही शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे कापूस विकावा लागत आहे. दिवाळीनंतर कापसाची आवक वाढली आहे कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे सीसीआय केंद्राचे हमीभाव 7500 आहेत मात्र कापसाच्या खाजगी बाजारपेठेत कापसाचे दर उतरलेले आहेत खाजगी व्यापारी कापसाला ६०००/६५०० प्रमाणे भाव देत आहेत शेतकऱ्यांना आर्थिक अडचण असल्याने नाईलाजाने हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे
हमीभाव पेक्षा कमी भाव
केंद्र सरकारने २०२४/२५ साठी कापसाच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ केली आहे चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसाला ७१२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७५२१ रुपये हमीभाव जाहीर केला आहे परंतु खाजगी व्यापारी त्यापेक्षा कमी दर देत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे नैसर्गिक आपत्तीनंतर उरलेल्या कापसाला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती दसऱ्यापासूनच बाजारात बागायती कापूस दाखल झाला सी सी आय म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या माध्यमातून देशभरात हमीभावाने कापसाची खरेदी केंद्र सुरू केली जातात सीसीआयच्या माध्यमाने देशात यंदा ५०० केंद्रांच्या माध्यमातून कापूस खरेदी केली जात आहे जळगाव जिल्ह्यात ७ पैकी ४ खरेदी केंद्रांवर कापूस खरेदी केला जात असल्याची माहिती मिळालेली आहे.
दिवाळीच्या काळात कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती मात्र कापसाचे दर 6000 च्या आसपास फिर असल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवलेला आहे
कापसाला १०/१२ हजारांचा भाव मिळावा
जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काही भागात अवकाळी पावसामुळे कापसावर रोगांचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यंदा कपाशीला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र दुसरीकडे फक्त पाच ते सहा हजार रुपये क्विंटल इतकाच भाव सध्या कपाशीला मिळत असून उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे कापसाला किमान दहा ते बारा हजार रुपये क्विंटल भाव मिळावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून यात महायुतीला मोठे यश प्राप्त झाले आहे जळगाव जिल्ह्यातून महायुतीचे आमदार मोठ्या मतांनी निवडून आले आहेत राज्याच्या राजकारणात त्यांचे मोठे वजन निर्माण झालेले आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला दर मिळावा यासाठी आगामी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली आहे तसेच कापसाच्या हमीभावात वाढ न झाल्यास शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा पण दिलेला आहे
प्रतिक्रिया
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक एकर कापूस उत्पादन खर्च जवळपास ८ हजार रुपये येत आहे तसेच एका एकरात ४ क्विंटल उत्पादन येत असुन ४× ८०००=३२००० कापसाला उत्पादन खर्च येत असून येणारं उत्पादन ४×६५००= २६००० -३२०००= ६००० रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सन २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी भाजपाच्या जाहीरनाम्यात कापसाला हमीभावावर अधिक दीड पट नफा देऊ असं म्हटलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आज कापसाचा हमीभाव ७५२१+ दीड पट ११२८१=१८८०२ रुपये एवढा कापसाला भाव मिळायला पाहिजे मात्र आम्ही फक्त १०,००० क्विंटल प्रमाणे कापसाला भाव द्या अशी मागणी करत आहोत अन्यथा येणाऱ्या दिवसात शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल
संदीप आधार पाटील
उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ,
शेतकरी संघटना
No comments