१५ व १६ डिसेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट येणार असल्याची शक्यता ? मुंबई वृत्तान्त संपादक हेमकांत गायकवाड राज्यातील वातावरणात सात...
१५ व १६ डिसेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट येणार असल्याची शक्यता ?
मुंबई वृत्तान्त
संपादक हेमकांत गायकवाड
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असल्याने काही ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवत आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यादरम्यान, हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांचेकडून प्राप्त माहितीनुसार, १५ व १६ डिसेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट येणार असल्याची शक्यता आहे. राज्यात हाडं गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ५ चे किमान तापमानं हे बऱ्याच ठिकाणी एक अंकी संख्येवर आले आहे, ही तापमाने सरासरीपेक्षा २ ते ६ डिग्रीपर्यंत खालावून जळगांव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा धाराशिव, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात या दोन दिवसात थंडीची लाट व काही जिल्ह्यात थंडीची लाटसदृश्य स्थितीची शक्यता जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे. सध्या जाणवत असलेली अपेक्षीत थंडी बुधवार दिनांक १८ डिसेंबर (संकष्टी चतुर्थी) पर्यंत टिकून राहण्याची शक्यताही कायम आहे.

No comments