adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

परभणी येथील भीमसैनिक हत्याकांड प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांसह संविधान अवमान प्रकरणी जन आक्रोश मोर्चा

  परभणी येथील भीमसैनिक हत्याकांड प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांसह संविधान अवमान प्रकरणी जन आक्रोश मोर्चा चोपड्यात भीमसैनिकांच्या जन आक्रोश मोर्चा ...

 परभणी येथील भीमसैनिक हत्याकांड प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांसह संविधान अवमान प्रकरणी जन आक्रोश मोर्चा

चोपड्यात भीमसैनिकांच्या जन आक्रोश मोर्चा अमितशहानीं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमान केल्याने निषेध.. 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रभणी येथे एका माथे फिरूने संविधानाचे प्रत फेकून अपमान केला या घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिक यांनी मोर्चा काढला. त्या मोर्चातील सोमनाथ सूर्यवंशी याला अमानुष मारहाण केल्यानंतर त्याचा कारागृहात संशयास्पद मृत्यू झाल्याने त्या घटनेच्या निषेधार्थ चोपड्यात आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने पंचशील नगर येथून गुजराथी गल्ली गोल मंदिर मेन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक तहसील कार्यालय पर्यंत निषेध मोर्चा आज काढण्यात आला.या निषेध मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते.परभणी घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या मोर्चात करण्यात आली. तसेच दिल्ली येथे अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला त्या घटनेच्या निषेधार्थ देखील घोषणा देण्यात आल्या.हा मोर्चा मेन रोडने तहसील कार्यालयात आणण्यात आला या ठिकाणी तहसीलदारांना परभणी घटनेचे दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या आशयाच्या निवेदन देण्यात आले. यावेळी चोपडा तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments