"मानसिक स्वास्थ्य शारीरिक आरोग्याची गुरुकिल्ली. " डॉ.तेजांशु सरोदे मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:-हेमकांत गायकवाड...
"मानसिक स्वास्थ्य शारीरिक आरोग्याची गुरुकिल्ली. " डॉ.तेजांशु सरोदे
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय मिशन सहासी अभियानाचा आज १९/१२/२०२४ तिसरा दिवस आजच्या पहिल्या सत्रात डॉ. सौ. प्रणिता सरोदे यांनी विद्यार्थिनींना योगा चे प्रशिक्षण दिले. यात विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.
दुसऱ्या बौद्धिक सत्रात मिशन सहासी अभियाना अंतर्गत लाभलेले डॉ. तेजांशु सरोदे यांनी युवतीचे "शारीरिक आणि मानसिक आरोग्य" या विषयावर बोलताना असे सांगितले की,मन आणि शरीर वेगळे नाहीत. शरीराचापरिणाम मनावर होत असतो .
जगभर रात्रंदिवस बरेच काही घडत आहे आणि आजूबाजूला घडणाऱ्या दुर्दैवी घटना पाहून अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडत असते त्यामुळे वेळोवेळी चिंताग्रस्त किंवा चिंतित असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मानसिक आजार झाला आहे. मानसिक आजार ही मानसिक आरोग्याशी संबंधित एक स्थिती आहे जी तुम्ही दैनंदिन कार्य ,कसे विचार करता किंवा कसे करता त्यात हस्तक्षेप करते. थोडक्यात म्हणजे विचार आणि भावना यांचे नियमन करता आले पाहिजे. असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभियान यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. संजीव साळवे विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा. डॉ. अतुल बडे सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा. सविता जावळे महिला विद्यार्थी विकास अधिकारी तसेच युवतीसभेचे सदस्या प्रा. डॉ. ताहिरा मीर, प्रा. डॉ. सुरेखा चाटे, प्रा. सीमा राणे यांनी परिश्रम घेतले.

No comments