बोदवड उपसा सिंचन योजनेमुळे बोदवड तालुका हिरवागार होणार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून २००कोटींचा निधी मंजूर बोदवड/रावेर प्रति...
बोदवड उपसा सिंचन योजनेमुळे बोदवड तालुका हिरवागार होणार
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून २००कोटींचा निधी मंजूर
बोदवड/रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
बोदवड तालुका हिरवागार करण्यासाठी मुक्ताईनगर चे कार्यसम्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळे रखडलेला बोदवड परिसर उपसा जलसिंचन योजना प्रकल्प पुर्णत्वासाठी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्प पुर्ण होईल व बोदवड तालुका हिरवागार होणार आहे जळगाव जिल्हा आणि बुलडाणा जिल्ह्यातील ५३ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रासाठी वरदान ठरणाऱ्या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेसाठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद मंजूर झाल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली. यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वेग मिळणार असून बोदवड तालुक्यातील ११ हजार ५०० हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा लाभ होईल. या प्रकल्पाला उभारी देणारे आमदार चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागाचे नवं हरित क्रांतीचे खरे प्रणेते ठरणार असल्याने शेतकऱ्यात चर्चा आहे.
बोदवड परिसर उपसा सिंचन योजना प्रकल्प कधीपासून च प्रलंबित होता
बोदवड परिसर उपसा सिंचन योजना हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने रखडलाही होता या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत पाठपुरावा केला होता. तर सरकार स्थापनेनंतर पहिल्याच हिवाळी अधिवेशनात २०० कोटी रुपयांची या प्रकल्पासाठी तरतूद झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. हा निधी मंजूर होण्यामुळे प्रकल्पाच्या कामाला नवीन ऊर्जा मिळाली आहे. बोदवड तालुक्याचा अवर्षणग्रस्त पट्टा या योजनेमुळे हिरवागार होणार आहे.

No comments