रक्ताने पत्र लिहून जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम मार्फत निवेदन देणार -:- जगदिश मानवतकर वाशीम प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) सर्वांना ज...
रक्ताने पत्र लिहून जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम मार्फत निवेदन देणार -:- जगदिश मानवतकर
वाशीम प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
सर्वांना जय शिवराय ! जय लहुजी ! जय भीम ! जय संविधान! जगदिश मानवतकर यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून अमित शहा यांना जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत पत्र पाठविले असून त्याच बरोबर भारताचे गृहमंत्री यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेल्या अपमानाचा निषेध त्यांनी आपल्या रक्ताने लिहून लिहून करणार आहेत.त्यानंतर नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन अमित शहा यांना या भारतातली नव्हे तर जगातील आंबेडकर अनुयायी आणि आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते यांची जाहीर माफी मागावी आणि अमित शहा यांना तात्काळ गृहमंत्री पदावरून हद्दपार करावे . याकरिता रक्ताने पत्र लिहून जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम मार्फत निवेदन देणार आहेत .तरी वाशीम मधील सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आज ठीक ०४:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम येथे उपस्थित राहावे.ही विनंती.

No comments