४ जानेवारी रोजी मुक्ताईनगरचे उज्जैन कर फाउंडेशन व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने युवा तिसरे मराठी साहित्य सं...
४ जानेवारी रोजी मुक्ताईनगरचे उज्जैन कर फाउंडेशन व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने युवा तिसरे मराठी साहित्य संमेलन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
शिवचरण उज्जैनकर, फाउंडेशन मुक्ताईनगर, श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन हे १४ डिसेंबर २०२४ वार शनिवार रोजी आयोजित केलेले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे संमेलन ४ जानेवारी २०२५ वार शनिवार रोजी नियोजित केलेले आहे. या संदर्भात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांची मीटिंग आयोजक श्री ज्ञानेश्वर चरित्र समितीचे अध्यक्ष तथा या संमेलनाचे संयोजक प्रकाश काळे आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव संमेलनाचे सहसंयोजक अजित वडगावकर आणि ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सन्माननीय खजिनदार तथा या संमेलनाचे निमंत्रक डॉ. ज्ञानेश्वर ( दिपक ) पाटील साहेब यांच्या उपस्थितीत नुकतीच मिटिंग संपन्न झाली. याप्रसंगी सविस्तर चर्चा होऊन संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सर्वांनुमध्ये ठरले व हे संमेलन ४ जानेवारी २०२५ वार शनिवारला आयोजित करण्याचे सर्वानुमते ठरलेले आहे. याची सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाराष्ट्रातील सर्व साहित्यिक रसिकांनी यांनी नोंद घ्यावी असे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे .या सभेला श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सहाय्यक शिक्षक विकास शिवले, शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ.अजयकुमार लोळगे, राज्य सल्लागार रामचंद्र कुऱ्हाडे, तसेच या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा फाउंडेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष एम आय टी ज्ञानेश्वर बी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ , या संमेलनाच्या निमंत्रक तथा फाउंडेशनच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष सौ. रूपालीताई चिंचोलीकर, उज्जैनकर फाउंडेशनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ईश्वरदास मते उज्जैनकर फाउंडेशनचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन मदनकर ,फाउंडेशनचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव रामचंद्र गुरव, फाउंडेशनचे आजीव सभासद तथा उज्जैनकर यांचे चिरंजीव अरविंद उज्जैनकर आदी सन्माननीय पदाधिकारी या सभेला उपस्थित होते.

No comments