परभणी येथील घटनेचा वाशिम आंबेडकर अनुयायी आणि संविधान प्रेमी यांच्या वतीने निषेध. वाशीम प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) दिनांक १० / ...
परभणी येथील घटनेचा वाशिम आंबेडकर अनुयायी आणि संविधान प्रेमी यांच्या वतीने निषेध.
वाशीम प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
दिनांक १० / १२ /२०२४ रोजी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या विश्वरत्न महामानव संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची आणि संविधानाची प्रतिकृती असणाऱ्या प्रतिमेची
ऐका समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली. यामुळे संपूर्ण भारतभर या घटनेचा जाहीर निषेध ठिकठिकाणी होत आहे .
त्यामुळे वाशिम मध्ये सुद्धा विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना चे संस्थापक अध्यक्ष तथा बहुजन भारत पार्टीचे राज्यसचिव जगदीश मानवतकर , अखिल भारतीय मातंग महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागडे साहेब, वाशिम मधील आंबेडकर नेते दौलतराव हिवराळे साहेब , तरुण पत्रकार विनोद तायडे साहेब, विनोद पट्टेबहादूर साहेब ,बहुजन भारत पार्टीचे वाशिम तालुकाध्यक्ष मनोज खडसे , तालुका उपाध्यक्ष राजू राऊत, बहुजन भारत पार्टीचे तालुकाध्यक्ष ( ऑटो ) राहुल खडसे , रवी ठोके जिल्हाध्यक्ष बहुजन भारत पार्टी , गौतम कंकाळ, शहर अध्यक्ष आशिष कोकरे युवा जिल्हाध्यक्ष,केशवराव उचित , विनोद वानखडे, गणेश चंद्रशेखर , गौतम वानखेडे सुभाष साबळे, राजेश भुसारे , अश्रू चव्हाण यांच्यासह वाशिम मधील सर्वच आंबेडकर अनुयायी आणि संविधान प्रेमी यांची बहुसंख्येने उपस्थित होती
यावेळी उपस्थितथा कडून मुख्यमंत्री यांना निवेदनातून अशी मागणी करण्यात आली की परभणी येथील आरोपीच्या मागे कोणाचा हात आहे याचा शोध लावावा , परभणीत दलित वस्तीतील पोलिसांकडून देणारे कोंबिंग तात्काळ थांबवावे , महिला आणि पुरुष यांना बेदम करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करावी , अशा प्रकारचे गुन्हे होऊ नये म्हणून उपाययोजना करावी , महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांना कडक शासन द्यावे. अशा व बऱ्याच मागण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी बहुसंख्य प्रमाणात तरुणांची उपस्थिती होती.





No comments