लिव्ह इन रिलेशनशिप बाबत सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय नवी दिल्ली वृत्तसंस्था -:- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) लिव्ह इन रिलेशनशिप बाब...
लिव्ह इन रिलेशनशिप बाबत सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
लिव्ह इन रिलेशनशिप बाबत सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय घेतला आहे. नऊ वर्षे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने बलात्काराचा गुन्हा रद्द केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ? नवी मुंबई खारघर येथे राहणाऱ्या एका विवाहित पुरूषाने अर्थिक मदत बंद केली म्हणून लिव्ह इन रिलेशन नात्यात राहणाऱ्या एका विधवा महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायलायाने बलात्काराचा गुन्हा फेटाळला आहे. महिलेनी जी तक्रार दाखल केली होती यामध्ये प्रथमदर्शनी सर्वोच्च न्यायालयाला कुठेही गुन्हा घडलेला दिसून आलेला नाही.जेव्हा ही महिला कोणतीही तक्रार न करता ही महिला नऊ वर्षे इतका प्रदीर्घ काळ स्वखुशीने नात्यात राहते, तेव्हा बलात्काराचा गुन्हा यामध्ये होऊ शकत नाही, असे म्हणत सुप्रीम कोर्टाने हा गुन्हा रह केला आहे
No comments