टु व्हिलर चालक व मागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे ? मुंबई वृत्तान्त -:- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) हेल्मेटचा वापर करत नसलेले दुचाकीस्वार ...
टु व्हिलर चालक व मागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे ?
मुंबई वृत्तान्त -:-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हेल्मेटचा वापर करत नसलेले दुचाकीस्वार व मागे बसणाऱ्या सहप्रवाशांवर कारवाई करण्यात येणार असून राज्य परिवहन विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती समोर आलीय त्यामुळे येणाऱ्या काळात दुचाकीस्वार आणि हेल्मेटशिवाय प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांविरोधात कारवाई आणखी कठोर होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात मुंबईतील पोलिसांकडून १७७० हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून आजवर १०७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या सहप्रवासी यांचा अपघातात मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर आणि पाठीमागे बसणारे सहप्रवासी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश परिवहन विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांचे ई- चलान मशिन बदलून स्वतंत्ररित्या नोंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात हेल्मेटशिवाय प्रवास करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे. दुचाकीस्वार आणि त्याच्या सहप्रवाशांनी हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. या संदर्भात कायद्याने आधीच दंडाची तरतूद केली आहे. मात्र हेल्मेट न घालणाऱ्या सहप्रवाशावर अशी सक्तीची कारवाई करण्यात आली नाही. तसेच हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासंदर्भात विशेष मोहीमही राबविण्यात येत होती. मात्र या नव्या सूचनांनंतर सहप्रवाशांवरील कारवाईतही वाढ होणार आहे. यावर्षी, पोलिसांनी हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांविरुद्धची कारवाई अधिक तीव्र केली आहे. २७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुंबई वाहतूक पोलिसांनी दोन वर्षांत १०७ कोटी रुपयांची ८ लाख २७ हजार ८१२ ई-चलान दंडात्मक कारवाई केलीय.
No comments