महा-ई-सेवा केंद्र संचालक व आधार सेवा केंद्र संचालकांचे राज्यस्तरीय अधिवेशन खान्देशतील सर्व केंद्र चालकांनी उपस्थित राहवे. श्री.जगदीश युवराज ...
महा-ई-सेवा केंद्र संचालक व आधार सेवा केंद्र संचालकांचे राज्यस्तरीय अधिवेशन
खान्देशतील सर्व केंद्र चालकांनी उपस्थित राहवे. श्री.जगदीश युवराज तायडे जिल्हा युनियन अध्यक्ष,जळगांवजगदीश युवराज तायडे
जिल्हा युनियन अध्यक्ष,जळगांव
जळगाव प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
जळगांव :- अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटना महाराष्ट्र राज्य अंतर्गत शिर्डी येथे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दि.८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत नगरपालिकेच्या मागे,विठ्ठल रुख्मणी मंदिरामध्ये होणार असल्याची माहिती आपले सरकार सेवा CSC केंद्राचे जळगांव जिल्ह्याचे जिल्हा युनियन अध्यक्ष,श्री.जगदीश युवराज तायडे यांनी पत्रकांद्वारे दिली.
अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र यांची महाराष्ट्र राज्यामध्ये संघटना असून ही संघटना महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संचालकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडविण्याचे काम करते दि.८ डिसेंबर रोजी शिर्डी येथे होणार्या राज्यस्तरीय अधिवेशनात महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र चालकांना येणाऱ्या अडचणींवर विचारविनिमय करण्यांत येणार असून या अडचणी सोडविण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्वात जुने महा-ई-सेवा केंद्र संचालक व आत्ताचे संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित तरुण तडफदार आमदार मा.श्री.अमोल खताळ व काही प्रमुख पाहुण्यांची उपस्थित राहणार आहे तरी खान्देशातील सर्व महा-ई-सेवा केंद्र संचालकांनी व आधार सेवा केंद्र चालकांनी जास्त संख्येने उपस्थित राहणे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री.जगदीश युवराज तायडे यांनी केले आहे.
No comments