adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगाव तालुक्यात बियाणांच्या काळाबाजार जोरात ?

  धरणगाव तालुक्यात बियाणांच्या  काळाबाजार जोरात ? बियाणाच्या किंमतीत शेतकऱ्यांची मोठी लूट  काल्पनिक फाईल चित्र  विकास पाटील जळगाव (संपादक -:...

 धरणगाव तालुक्यात बियाणांच्या  काळाबाजार जोरात ?

बियाणाच्या किंमतीत शेतकऱ्यांची मोठी लूट 

काल्पनिक फाईल चित्र 

विकास पाटील जळगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव -:- यावर्षी अति पावसामध्ये शेतकरी होर पडलेला असताना शेतीची उत्पन्न कोल मधून पडले आहे. तसेच कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात बोंड अळीच्या प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली आहे. शेतकरी उभ्या पिकावरती रोटावेटर फिरवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाचा पेरा कडेकल वाढला आहे. यावर्षी पाऊस  चांगला असल्यामुळे शेतातील विहीर बोर यांना पाणी चांगले असल्यामुळे शेतकरी मका, गहू ,हरभरा,ज्वारी असे इतर पिकांची पेरणी करत आहे. 

             शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी अधिक कर्जबाजारी झालेला आहे त्यातल्या त्यात आता शेतकऱ्यांना मका पिकाची लागवड करण्यासाठी बियाणं अव्वाच्या सव्वा किमतीत घ्यावे लागत आहे. धरणगाव तालुक्यात कृषी केंद्र चालकांकडून मका पिकाच्या बियाण्याच्या किमती अवाढव्य आकारण्यात येत आहेत. हायटेक ,पायनियर, ऍडव्हान्टा, राशी, इको,  अशा इतर कंपन्यांच्या बियाणांच्या किमतीत कृषी केंद्र  चालकांकडून  1400 चे बियाणे  500 ते 1000 रुपये जास्तीने घेतले विकले जात आहे. आधार भूत किमती पेक्षा जास्त दर शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे. अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. तरी संबंधित विभागाचे या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. शेतकरी आधीची कर्जबाजारी झालेला असताना आता जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर येत आहे. सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांची खूप मोठी लुटी चाललेली दिसत आहे. एकीकडे निवडणुका संपल्या असून निवडून आलेले आमदार हे मंत्रिमंडळ गठीत करण्यात व्यस्त आहेत. आता शेतकऱ्यांकडे लक्ष देणार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहे.  शेतकऱ्यांच्या बियाण्यात काळाबाजार करणाऱ्या दलालांना व शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेऊन बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर काय कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागू आहे.

No comments