विविध समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेतील दिलेल्या निवेदनांचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब चोपडा प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड)...
विविध समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेतील दिलेल्या निवेदनांचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब
चोपडा प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरात नागरिकांना विविध समस्यांनी त्रस्त केलेले होते, त्या संदर्भात काँग्रेस तर्फे वेळोवेळी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सदर समस्या सोडवण्यासाठी कळविलेले होते. निवेदन देऊन सहा आठ महिने उलटले होते तरीही समस्या सुटलेले नव्हती या संदर्भात दिनांक 13 रोजी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष ॲड संदीप पाटील,माजी तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजीव सोनवणे, माजी शहराध्यक्ष के. डी. चौधरी, अशोक साळुंखे, माजी नगरसेवक फातिमाबी पठाण, आरिफ शेख, यशवंत खैरनार, शांताराम लोहार, विलास दारुंटे, जहीर शेख, अब्दुल हमीद शेख यांचे सह इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या दालना मध्ये जाऊन सदर समस्या सोडविल्या गेल्या किंवा नाही याबाबत मुख्याधिकारी राहुल पाटील यांना जाब विचारला. सर्वप्रथम चोपडा शहरातील मुख्य रस्ते जे आहेत त्या रस्त्यांवर असलेल्या दुकानांमध्ये ग्राहक आल्यानंतर त्यांची दुचाकी किंवा चारचाकी वाहने दुकानासमोरच रस्त्याला रहदारीला अडथळा करतील असे लावलेले असतात. यासंदर्भात त्यांना पार्किंगची व्यवस्था करण्यास आपण सुचवलेले नव्हते काय? असा प्रश्न विचारून नगररचनाकार चेतन अहिरराव यांनी याबाबत सांगितले की, याबाबत पार्किंगची व्यवस्था व्हावी यासाठी नियोजन केलेले आहे. लवकरच अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले. त्यानंतर शहरात मोकाट कुत्रे आणि मोकाट जनावरे यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे सांगून मागील काही काळात या समस्या सोडवाव्यात म्हणून निवेदन दिलेले होते. यावर कार्यवाही काय केली असे सांगताना नगरपालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निबिजीकरण करणे बाबत कार्यादेश झाला असून पुढील आठवड्यात सदर काम केले जाईल. तसेच मोकाट जनावरांना कोंडवाड्यात कोंडून त्यांच्या मालकांकडून दंड वसूल करून जनावरांना खुंट्यावर बांधून ठेवावे किंवा चरण्यासाठी त्यांची व्यवस्था करावी असे सांगून ती समस्या ही सुटणार असल्याचे सांगितले. तसेच शहरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे याबाबत लवकरच रस्त्यांची कामे सुरू होतील आणि भुयारी गटारीसाठी सर्व रस्ते खोदून त्यांची नासधूस झालेली आहे ते सर्व रस्ते पूर्ववत केले जातील असेही नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

No comments