श्रीमती. जी. जी.खडसे महाविद्यालयात युवती सभेअंतर्गत मिशन साहसी अभियानास सुरुवात मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:-हेमकांत गा...
श्रीमती. जी. जी.खडसे महाविद्यालयात युवती सभेअंतर्गत मिशन साहसी अभियानास सुरुवात
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग तसेच श्रीमती जी.जी .खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "मिशन साहसी अभियान" आज दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी श्रीमती जी.जी खडसे महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू करण्यात आले. सदर अभियानाची सुरुवात मा. प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली एकूण सहा दिवस चालणाऱ्या अभियानामध्ये विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्यासाठी डॉ. सौ. प्रणिता सरोदे मॅडम यांची ,"योगा प्रशिक्षक "म्हणून उपस्थिती असणार आहे. प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा म्हणजे बौद्धिक सत्र या बौद्धिक सत्रामध्ये ॲड. सौ.रूपाली भोकरीकर मॅडम यांनी "स्त्री संरक्षण कायदे" या विषयावर विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन कायदे विषयक मार्गदर्शन केले. अभियान यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. संजीव साळवे विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा. डॉ. अतुल बढे सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा. सविता जावळे महिला विद्यार्थी विकास अधिकारी तसेच युवतीसभेचे सदस्या प्रा. डॉ. ताहिरा मीर, प्रा. डॉ. सुरेखा चाटे, प्रा. सीमा राणे यांनी परिश्रम घेतले.

No comments