adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साई किरण इंग्लिश स्कूल काटा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन.

 साई किरण इंग्लिश स्कूल काटा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन. वाशीम प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) (वाशीम दि ८ ) वाशिम जिल्ह्यात...

 साई किरण इंग्लिश स्कूल काटा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन.


वाशीम प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

(वाशीम दि ८ ) वाशिम जिल्ह्यातील काटा या ठिकाणी संविधान निर्माते परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून  अभिवादन करण्यात आले . सविस्तर वृत्त असे की साई किरण इंग्लिश स्कूल काटा या ठिकाणी संविधान निर्माते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर २०२४ महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला साई किरण इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष श्री शिवाजी देशमुख सर यांनी  अभिवादन केले . या कार्यक्रम यामध्ये शाळेतील चिमुकल्यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे सादर केलीत. त्यानंतर समारोपीय कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष श्री शिवाजी देशमुख सर यांनी '' डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे आणि त्यांच्यासारखे उच्च शिक्षण घेऊन आपल्या शाळेचे नाव, गावाचे नाव आणि परिवाराचे नाव उज्वल करावे.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रकारे परिस्थितीला सामोरे जाऊन यश मिळवले .


त्याच प्रकारे विद्यार्थ्यांनी सुद्धा कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन शिक्षण घेऊन आपले जीवन सफल करावे.  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पूर्ण करावे तरच त्यांना खरी मानवंदना ठरेल असे विचार मांडले''  .तर जगदीश मानवतकर सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे नव्हे  तर जगाचे भाग्यविधाते आहेत . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक देशात शैक्षणिक क्रांती घडली.  त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा शिक्षणामध्ये क्रांती करून डॉ.बाबासाहेबा आंबेडकर यांच्या  पाऊला वर पाऊल ठेवून उच्चशिक्षित व्हायचे आहे.  हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल.  असे विचार मांडले तर माधव डोंगरदिवे सरांनी '' डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांनी आपले आदर्श मानले पाहिजे . त्यांच्यासारखे विचार आत्मसात करून आपल्या जीवनात यश मिळवले पाहिजे .''  असे विचार मांडले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.भक्ती देशमुख हिने केले  तर आभार प्रदर्शन कु.उर्वशी देशमुख यांनी केले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋचा अवचार मॅडम यांनी परिश्रम घेतले.

तर यावेळी गजानन देशमुख सर, अभिजीत भागवत सर , अमोल मोरे सर , अमर सरनाईक सर ,  दीक्षा इंगोले मॅडम, पूजा सरनाईक मॅडम , मनीषा सुळे मॅडम ,मनीषा काकडे मॅडम,  साधना चव्हाण मॅडम , नैना देशमुख मॅडम यांची उपस्थिती होती. कार्यक्रम संपल्यावर विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार केला आणि या प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments