मिलत नगर फैजपूर मधील भर रस्त्यात असलेली डीपी मुळे मोठा अपघात होण्याची शक्यता ? रावेर,फैजपूर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत...
मिलत नगर फैजपूर मधील भर रस्त्यात असलेली डीपी मुळे मोठा अपघात होण्याची शक्यता ?
रावेर,फैजपूर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरातील मिलत नगर भागातील पन्नास फुटाच्या रास्ते चे मध्यभागी असलेली डीपी मुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नकारता येणार नाही फैजपूर शहरातील एम मुसा जन विकास मल्टीपर्पज सोसायटी असंघटित गवंडी कामगार संघटना व श्रमिक कोहिनुर कामगार संघटना नाशिक विभाग तर्फे महावितरण विभागीय अधिकारी नगरपरिषद मुख्य अधिकारी फैजपूर यांना निवेदन देऊन सुद्धा अनेक वर्ष उलटून गेले तरी ही डीपी भर रस्त्यातच आहे
या भागात बहिणाबाई माध्यमिक मराठी शाळा फातिमा उर्दू गर्ल हायस्कूल विसडम इंग्लिश मीडियम स्कूल चे विद्यार्थी या रस्त्याचा वापर करीत आहे हा मिल्लत नगर मधील हा रहदारीचा मोठा रास्ता हा रस्ता खरोदा मार्ग पाल कडे जात आहे तरी ही डीपी लवकर हटवण्यात आली नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता नकारता येणार तरी काही जीवत हानी झाली तर कोण जवाबदार राहील? असा प्रश्न नागरिकांचे मनात आहे अनेक वेळी महावितरण अधिकारी व नगरपालिका अधिकारी कडे लेखी तक्रार निवेदन देऊन सुद्धा आतापर्यंत हे डीपी चे काम मार्गी लागले नाही महावितरण अधिकारी चे म्हणणे आहे
की हे डीपी हटवण्यासाठी साठी लागणारा खर्च कोण देणार फैजपूर शहरात नगरपरिषद मध्ये तीन वर्षापासून प्रशासकराज असून ही समस्या कडे कोण लक्ष देणार तरी माननिय.खासदार केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे रावेर चे निवडून आलेले आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी या गंभीर बाबी कडे लक्ष देऊन ही डीपीचे कामे मार्गी लावावे अशी मागणी श्रमिक कोहेनूर कामगार संघटना चे अध्यक्ष शाकीर मलिक व कामगार वर्ग मिलत नगर राहिवासी नागरिक तर्फे करण्यात आली आहे



No comments