Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मुक्ताईनगर येथे स्वर्गीय निखिल भाऊ खडसे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

 स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मुक्ताईनगर येथे स्वर्गीय निखिल भाऊ खडसे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! मुक्ताईनग...

 स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मुक्ताईनगर येथे स्वर्गीय निखिल भाऊ खडसे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मुक्ताईनगर येथे स्वर्गीय निखिल भाऊ खडसे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल ज्यांच्या अनमोल प्रयत्नांतून साकारण्यात आली. समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण घेता यावे या परिकल्पनेतून वास्तवात अवतरलेली शाळा म्हणजे स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मुक्ताईनगर; या शाळेचे निर्माते म्हणजे स्वर्गीय निखिल भाऊ एकनाथरावजी खडसे यांची आज जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील इयत्ता ज्युनिअर के जी ते इयत्ता दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यातर्फे करण्यात आले त्यांना याप्रसंगी विनम्र अभिवादन. 

निखिल भाऊंच्या जिवणावर
आधारित भाषण देतांना शाळेचे प्राचार्य

या जयंतीप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. के. वडस्कर व सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांच्या सामूहिक  उपस्थितीत स्वर्गीय निखिल भाऊ खडसे यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करण्यात आली.


प्रत्येक व्यक्तीने जीवनात ध्येय व स्वप्न मोठी ठेवली पाहिजेत असे आपण सामान्यतः म्हणत असतो परंतु जीवनात केवळ ध्येय व स्वप्ने मोठे ठेवून चालणार नाही तर ती चांगल्या प्रकारची समाज उपयोगी, राष्ट्र उन्नतीस हातभार लावणारी अशी स्वप्ने व ध्येय आपण जोपासली पाहिजे आणि समाजात व मानवी विश्वात आपण गेल्यानंतरही आपली आठवण आणि आपली उणीव ही कायम जाणवली पाहिजे तेच खरे जीवन म्हणता येईल असे या जयंतीप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. के. वडस्कर यांनी स्वर्गीय निखिल भाऊ खडसे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगत व भाऊंचे कार्य स्पष्ट केले तथा विद्यार्थ्यांना याप्रसंगी चॉकलेट्स देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक स्वप्निल सुधाकर चौधरी, सहकार्य सहशिक्षक सतीश गायकवाड, अमोल सुतार इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लाभले.

No comments