Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

समाज भूषण पुरस्काराने जेष्ठ पत्रकार युसूफ शाह व डॉ.अनसार खान सन्मानित

  समाज भूषण पुरस्काराने जेष्ठ पत्रकार युसूफ शाह व डॉ.अनसार खान  सन्मानित रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) सावदा  तालु...

 समाज भूषण पुरस्काराने जेष्ठ पत्रकार युसूफ शाह व डॉ.अनसार खान  सन्मानित


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

सावदा  तालुका रावेर येथील अरेबिया महिला बहुउद्देशीय मंडळ सावदा तर्फे दि.२९ डिसेंबर रोजी डायमंड हॉल मस्कावद रोड सावदा येथे राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात राज्यभरातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात बहुमूल्य सेवा देणाऱ्या कर्तुत्ववान समाजसेवकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार व सन्मानित करण्यात आले. ज्यामध्ये दैनिक साईमत चे पत्रकार युसूफ शाह सुपडू शाह सावदा यांना समाज भूषण पुरस्कार मान्यवराच्या हस्ते देण्यात आला.याप्रसंगी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजक तथा सदर महिला मंडळ ची अध्यक्षा गजाला तबस्सूम मॅडम व सल्लागार कमाल सर यांचे इतरांना हवा सुटेल असे केलेले कार्य बद्दल उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक देखील केले. 

प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,सपोनि विशाल पाटील, सैय्यद अजगर कृ.उ.बाजार समिती सदस्य सावदा,मुकिम देशमुख(माजी सीईओ औरंगाबाद)अलहाजुद्दीन फारुकी,काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस धनंजय शिरीष दादा चौधरी,डायमंड इंग्लिश मीडियम चे अध्यक्ष डॉ.हारून सेठ,सलीम खान सर,अस्लम खान(जनाब)सह शहर व राज्यभरातून मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त मान्यवरांवर अभिनंदनाचा वर्षाव 

याचे औचित्य साधून आज ३० डिसेंबर रोजी शहिद अब्दुल हमीद स्मारक संस्था सावदा यांचे संचालक मंडळाने शेखपुरा येथे अभिनंदनाचा छोटेखानी कार्यक्रमात सदर पुरस्काराने सन्मानित पत्रकार युसूफ शाह,लोकांचे मनातील कोरोना योध्दे डॉ.अनसार खान सह पत्रकार फरीद शेख यांना सरप्राईज पद्धतीने बोलवून शाल व पुष्पगुच्छ देऊन सरकारने अभिनंदन केले.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सदर संस्थेचे अध्यक्ष तथा पदाधिकारी शेख मुख्तार,फिरोज खान,अमजद खान,सकलैन केला गृपचे संचालक शेर खान,डॉ.रईस खान,इरफान मियॉ,साजीद भाई,अलिम भाई,नासीर शेख,वसीम खान,राशीद सह इत्यादी उपस्थित होते.

No comments