नॅशनल स्केटिंग रेस स्पर्धेसाठी आव्हाणे येथील कुणाल पाटील याची निवड - जळगाव प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) आव्हाणे ता. जळगाव राज...
नॅशनल स्केटिंग रेस स्पर्धेसाठी आव्हाणे येथील कुणाल पाटील याची निवड -
जळगाव प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
आव्हाणे ता. जळगाव राज्यस्तरावरील स्केटिंग रेस स्पर्धेत रिले मॅच व स्केटिंग रेस मध्ये अंडर १७ या गटामध्ये कुणाल ज्ञानेश्वर पाटील याने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला व तीन गोल्ड मेडल मिळवत पुढील महिन्यात गोवा येथे होणाऱ्या रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया च्या टॉप नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे
छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी व छत्रपती संभाजी नगर जिल्हा क्रीडा परिषद आणि रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आले होते या राज्यस्तरावरील नागपूर पुणे संभाजीनगर जळगाव भुसावळ अमरावती सांगली सातारा बारामती अशा अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते या राज्यस्तरावरील रिले मॅच व स्केटिंग रेस मध्ये कुणाल ज्ञानेश्वर पाटील यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला व तीन गोल्ड मेडल मिळवले तर पुढील महिन्यात गोवा येथे होणाऱ्या रोलर व रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नॅशनल स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे यासाठी त्याला मेजर स्पोर्ट्स क्लब जळगाव चे कोच विशाल मोरे व शाळेचे शिक्षक सचिन वंजारी यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे कुणाल पाटील यांच्या आई-वडिलांनी सांगितले कुणाल पाटील हा भंगाळे गोल्ड चे मालक श्री भागवत भंगाळे यांचे वाहन चालक श्री ज्ञानेश्वर तुकाराम पाटील यांचा चिरंजीव आहे.
भगवान चौधरी

No comments