वैजापुर येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील उर्वरीत आरोपींना तात्काळ अटक करा. चोपडा प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड दि.०६/१२/२०२४ रोजी ...
वैजापुर येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील उर्वरीत आरोपींना तात्काळ अटक करा.
चोपडा प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
दि.०६/१२/२०२४ रोजी वैजापुर येथे कै.सुरेश ओंकार बारेला यांच्यावर खुनी हल्ला होऊन त्याच्यावर लाकडी दंडे,दगड, लाथा - बुक्के मारून त्यांचा खून करण्यात आला होता तरी कै.सुरेश ओकार बारेला रा.बढवाणी,ता.चोपडा जि.जळगांव यांच्यावर वैजापुर येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील उर्वरीत आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की बारेला-पावरा आदिवासी बांधव यांनी पोलिस निरीक्षक,ग्रामीण पोलिस स्टेशन ता.चोपडा जि.जळगांव यांनी कै.सुरेश ओकार बारेला रा.बढवाणी,ता.चोपडा जि.जळगांव यांच्यावर वैजापुर येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील उर्वरीत आरोपींना तात्काळ अटक करा.अशा आशयाचे निवेदन सादर केले दि.०६/१२/२०२४ रोजी वैजापुर येथे कै.सुरेश ओंकार बारेला यांच्यावर खुनी हल्ला होऊन त्याच्यावर लाकडी दंडे,दगड,लाथा - बुक्के मारून त्यांचा खून करण्यात आला आहे.तसा गुन्हा हि चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे,त्यात पोलिसांनी चांगली कामगीरी केलेली असुन सदरील घटनेत ११ आरोपींना अटक केलेली आहे,परंतु सदरील खुनाच्या गुन्ह्यात ११ पेक्षा जास्तीचे आरोपी आहेत व ते सध्या मोकाट फिरत आहेत.या घटनेतील आरोपी जर मोकाट राहीले तर कैः सुरेश ओंकार बारेला यांच्या परिवारास धोका निर्माण होवु शकतो. तरी पोलिस निरीक्षक,ग्रामीण पोलिस स्टेशन ता.चोपडा जि.जळगांव यांनी या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी विनंती करीत मागणी केली आहे दिलेल्या निवेदनावर ओंकार मालसिंग बारेला,रमेश महारु बारेला,यांचे सह नागरीकांच्या स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत

No comments