नगर परिषद मलकापूर नगर रचनाकार शिरीष बडगे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख अजय टप यांची निवेदनाद्वारे...
नगर परिषद मलकापूर नगर रचनाकार शिरीष बडगे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख अजय टप यांची निवेदनाद्वारे मागणी
प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा
प्रमुख अजय टप
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- मलकापूर न.प.हद्दीमध्ये बांधकाम करण्यापुर्वी घेण्यात येणार्या बांधकाम परवानगीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून नगर रचनाकार शिरीष बडगे हे सर्व नियमांना धाब्यावर बसवत परवानगी देत असल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांनी आज १० डिसेंबर रोजी न.प.मुख्याधिकारी व प्रशासक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मलकापूर शहरामध्ये नगर परिषद हद्दीमध्ये बांधकाम करण्यापुर्वी नगर परिषदेकडून रितसर बांधकाम परवानगी घेणे आवश्यक असते. त्याकरीता नगर रचनाकार विभागाकडून ही परवानगी देण्यात येते. या विभागामध्ये नगर रचनाकार पदावर कार्यरत असलेले शिरीष बडगे हे अधिकारी बांधकाम परवानगी देतेवेळी आर्थिक देवाण-घेवाण करून नियमांना डावलीत परवानगी देत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. मलकापूर शहरामध्ये गत् काही वर्षात व सुरू असलेल्या अनेक व्यावसायीक बांधकामांच्या ठिकाणी कुठलीही पार्कींगची व्यवस्था नसतांनाही त्यांना बांधकाम परवानगी देऊन ते बांधकाम नियमानुसार होत असल्याचे व झालेले असल्याचे न.प.दप्तरी दाखवून एकप्रकारे नियमांना डावलण्याचे काम नगर रचनाकार अधिकारी शिरीष बडगे यांच्या आशिर्वादाने सुरू आहे.
तेव्हा अशाप्रकारे शहरात अवैध व अनधिकृत बांधकामांना नियमानुसार दाखविणार्या नगर रचनाकार अधिकारी शिरीष बडगे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. तसेच शहरात झालेल्या बांधकामांची चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा येत्या २३ जानेवारी २०२५ पासून देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी त्यांच्या स्मारकासमोर अन्नत्याग आंदोलन उभारण्यात येईल. असा इशाराही अजय टप यांनी दिला आहे.
No comments