adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ.सी .आर. देवरे यांना युके कडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त

  डॉ.सी .आर. देवरे यांना युके कडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड)   महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दा...

 डॉ.सी .आर. देवरे यांना युके कडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी .आर .देवरे यांना नुकतेच UK कडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त झाले. डॉ. सी. आर. देवरे यांचे हे द्वितीय पेटंट आहे. या अगोदर त्यांना राष्ट्रीय दर्जाचे भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले होते .तसेच आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे युकेकडून पेटंट प्राप्त झाले आहे. सदर पेटंट साठी त्यांनी चार महिने अगोदर रजिस्ट्रेशन केले होते. त्यानुसार त्यांचे डिवाइस स्वीकारले जाऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहे. हे आंतरराष्ट्रीय पेटंट त्यांना " AI BASED COMPUTER DEVICE FOR EMPLOYEE EFFICIENCY CHECKING IN ORGANIZATION" मिळाले आहे . महात्मा गांधी शिक्षण मंडळातील दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे पेटंट प्राप्त करणारे ते पहिले प्राध्यापक आहेत. यासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील, तसेच संस्थेच्या सचिव डॉ. सौ .स्मिताताई संदीप पाटील , उपाध्यक्षा श्रीमती आशाताई विजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.के. एन.सोनवणे ,उपप्राचार्य डॉ.आर.एम. बागुल, उपप्राचार्य डॉ. ए.बी .सूर्यवंशी, महाविद्यालयाचे समन्वय डॉ. एस. ए .वाघ तसेच इतर सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments