adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुलाच्या विवाहामध्ये दोडे गुर्जर संस्थानाच्या इमारतीसाठी दिले १ लाख ११ हजार चोपडा येथील रवींद्र पाटील सर्वांकडून कौतुक

  मुलाच्या विवाहामध्ये दोडे गुर्जर संस्थानाच्या इमारतीसाठी दिले १ लाख ११ हजार चोपडा येथील रवींद्र पाटील सर्वांकडून कौतुक चोपडा प्रतिनिधी (सं...

 मुलाच्या विवाहामध्ये दोडे गुर्जर संस्थानाच्या इमारतीसाठी दिले १ लाख ११ हजार

चोपडा येथील रवींद्र पाटील सर्वांकडून कौतुक


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

शहरातील उद्योजक रवींद्र बळीराम पाटील यांचा मुलगा सचिन याचा शहरातील संस्कार मंडपम या ठिकाणी विवाह पार पडला. या कार्यक्रमामध्ये रवींद्र पाटील यांनी जळगाव जिल्हा दोडे गुर्जर संस्थानच्या इमारत बांधकामासाठी १ लाख ११ हजार १११ रुपयाची देणगी जाहिर करत धनादेश मान्यवरांच्या हाती सुपूर्द केला. चोपडा तालुक्यात प्रथमच लग्न कार्यात समाजासाठी एवढी मोठी देणगी देण्यात आली असून उद्योजक रवींद्र पाटील याचे सर्व समाज कडून कौतुक होत आहे. जळगाव जिल्हा दोडे गुर्जर संस्थानच्या विश्वस्त मंडळाकडे लग्न समारंभात तो धनादेश सुपूर्त केला आहे. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संस्थांनाचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी, विश्वस्त डी.बी. पाटील, अॅड. मंगलसिंग चौधरी, डॉ. तृप्ती पाटील, एम.व्ही. पाटील, प्रवीण पाटील, निश्चल पाटील यांच्याकडे तो धनादेश देण्यात आला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील   यांनी सांगितले की, समाजात असे दातृत्ववान लोक पुढे आले पाहिजे. यातून समाजाची उन्नती होत असते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोरख पाटील, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,आदी सह  गुजर समाजाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

No comments