adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धनाजी नाना महाविद्यालयाचा उत्कृष्ट महाविद्यालय व उत्कृष्ट मूल्यांकन केंद्र म्हणून विद्यापीठातर्फे गौरव

  धनाजी नाना महाविद्यालयाचा उत्कृष्ट महाविद्यालय व उत्कृष्ट मूल्यांकन केंद्र म्हणून विद्यापीठातर्फे गौरव इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमका...

 धनाजी नाना महाविद्यालयाचा उत्कृष्ट महाविद्यालय व उत्कृष्ट मूल्यांकन केंद्र म्हणून विद्यापीठातर्फे गौरव


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील अव्यवसायिक गटातील उत्कृष्ट महाविद्यालयाचा आणि उत्कृष्ट मूल्यांकन केंद्राचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या  कार्यगौरव सोहळ्यात  प्रमुख अतिथी माजी कुलगुरू प्राचार्य डॉ के बी पाटील यांच्या शुभहस्ते तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांच्या सहित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी , सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे यांच्यासहित व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ व्ही एल माहेश्वरी, प्र कुलगुरू प्रा डॉ एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या शिरोपेच्यात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला त्यात  उत्कृष्ट मूल्यमापन केंद्र  म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे यांच्यासहित केंद्र समन्वयक प्रा डॉ मारुती जाधव यांचाही सन्मान करण्यात आला. लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीकोनातून फैजपूर व पंचक्रोशीतील सामान्य, अति सामान्य कुटुंबाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाची सोय व्हावी व करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून समाज उत्थानाचे उदात्त कार्य साध्य होण्याच्या हेतूने सन १९६१ साली धनाजी नाना महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली धनाजी नाना महाविद्यालयामुळे पंचक्रोशी त फैजपूर चे नाव गौरविल्या गेल्याने संबंधितावर अभिनंदनचा वर्षाव व कौतुक होत आहे.

No comments