adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम

  चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड)     आज दिनांक १६ ड...

 चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

   आज दिनांक १६ डिसेंबर २०२४ वार सोमवार रोजी सकाळी ठीक ०९:०० वाजेपासून ते संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार माजी जिल्हाध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी राज्यात विधानसभेचे लागलेले निकाल हे अनपेक्षित व संशयास्पद असून नक्कीच ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा असल्याचं मत व संशय असल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी,लोकसभा सदस्य प्रियंकाजी गांधी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने जोरदारपणे मोहीम राबविण्यात आली. यावेळी जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा दिसून आला, तसेच या पुढील निवडणुका या बॅलेट पेपर वरच घेण्यात याव्यात असा सूर जनतेने व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी माजी तालुकाध्यक्ष सुरेश सिताराम पाटील,तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक नंदकिशोर सांगोरे,माजी शहराध्यक्ष के.डी.चौधरी, माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील,शेख आरिफ शेख सिद्दिकी,चो.सा.का. व्हाईस चेअरमन गोपाल धनगर,चो.सा.का. संचालक शरद धनगर,जिल्हा माजी सरचिटणीस अजबराव पाटील,माजी पंचायत समिती सदस्य अनिल हिम्मतराव पाटील,शेतकी संघ संचालक बाळकृष्ण शंकरराव सोनवणे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अब्दुल हमीद शेख,फातिमाबी पठाण,सूतगिरणी संचालक राजेंद्र सूतगिरणी संचालक वजाहत काजी,महिलाध्यक्षा योगिता चौधरी,शशिकांत चौधरी,बी.एम.पाटील,डॉ.बी.आर. पाटील,मधुकर विठ्ठल पाटील,ग.स.माजी संचालक रमेश एकनाथ शिंदे,जहीर शेख,मोहन देवराम पाटील,किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे,अनिल युवराज पाटील,अशोकराव साळुंखे,डॉ.अशोकराव कदम, डॉ.संदीप काळे,मनोहर पाटील,माजी नगरसेविका सुरेखाताई माळी,गोविंदा बापू महाजन,जी.एस. पाटील,छगन नारायण पाटील,सारंग महाजन,साहेबराव छगन पाटील,चेतन बाविस्कर,यशवंत खैरनार,शांताराम लोहार,प्रतापराव सोनवणे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments