adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शहर वकील संघटनेच्या अध्यक्षपदी राजू कातोरे,उपाध्यपदी वैभव आघाव तर सचिवपदी संदीप बुरके विजयी

 शहर वकील संघटनेच्या अध्यक्षपदी राजू कातोरे,उपाध्यपदी वैभव आघाव तर सचिवपदी संदीप बुरके विजयी अहिल्यानगर  प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवा...

 शहर वकील संघटनेच्या अध्यक्षपदी राजू कातोरे,उपाध्यपदी वैभव आघाव तर सचिवपदी संदीप बुरके विजयी


अहिल्यानगर  प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

(अहिल्यानगर दि २० )अहमदनगर बार असोसिएशन अहमदनगर कार्यकारी मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत अध्यक्षपदी राजू कातोरे हे विजयी झाले आहेत. उपाध्यक्षपदी वैभव आघाव तर सचिवपदी संदीप बुरके हे निवडणून आले आहेत.शुक्रवार ता. २० रोजी सकाळी झालेल्या मतदानाची सायंकाळी उशीराने मतमोजणी संपल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड.अरुण भालसिंग यांनी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर केला.या निवडणुकीत १ हजार ६९४ पैकी १ हजार १४७ मतदान झाले.या निवडणुकीत महिला सहसचिव,खजिनदार, महिला व पुरुष कार्यकारणी सदस्य आदी पदांची निवडणूक यापूर्वी बिनविरोध झाली होती.

No comments