सावदा -पिंपरूड महामार्गावर कार झाडावर धडकून भीषण अपघात रावेरतील तिघांचा मृत्यु तर दोघे गंभीर जखमी सदरील घटनेतील मयत रावेर प्रतिनिधी मुब...
सावदा -पिंपरूड महामार्गावर कार झाडावर धडकून भीषण अपघात
रावेरतील तिघांचा मृत्यु तर दोघे गंभीर जखमी
सदरील घटनेतील मयत
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
भिकनगांव पाल महामार्गावर सावदा-भुसावळ रस्त्यावरील सावदा
पिंपरूळ दरम्यान मध्यरात्री भरधाव कार झाडावर धडकून भीषण अपघात झाला या अपघातात रावेर शहरातील तीन युवकांचा दुदैवी मृत्यु झाला असल्याचे समजते तर चारचाकी वाहनातील इतर दोघे गंभीर जखमी झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की रावेर येथील मित्रमंडळी भुसावळ येथून पिंपरुड सावदा रस्त्यावरुन रावेर कडे येतांना आपल्या चारचाकी वाहन एमएच २० सीएस ८००२ गाडी भरधाव वेगाने झाडाला जोरदार धडक दिली. यात रावेर शहरातील शुभम सोनार (वय २५) मुकेश रायपूरकर (वर २३) व जयेश भोई हे जागेच ठार झाले. तर इतर गणेश भोई (फोटोग्राफर) सह अजुन एक गंभिर जखमी असुन जळगाव येथिल हॉस्पिटल मृत्यूशी झुंज देत आहे.
हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परत जात असताना रात्री दोन वाजता पिंपरुड सावदा दरम्यान ही घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. हा अपघात इतका भीषण होता की चार चाकी कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

No comments