adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोठे वाघोदा येथे १६ रोजी दत्तजयंती निमित्त यात्रा व पालखी सोहळा

  मोठे वाघोदा येथे १६ रोजी  दत्तजयंती निमित्त यात्रा व पालखी सोहळा रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:-हेमकांत गायकवाड ) रावेर तालुक्यात...

 मोठे वाघोदा येथे १६ रोजी  दत्तजयंती निमित्त यात्रा व पालखी सोहळा


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड )

रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दि १६ डिसेंबर सोमवार रोजी दत्त जयंतीनिमित्त यात्रा भरणार असुन गावातील श्रीकृष्ण मंदीरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे मोठा वाघोदा गावात पाच दत्त मंदिर असून, दत्त जयंती निमित्त येथे मोठी यात्रा भरते महानुभाव परंपरेनुसार येथे वर्षानुवर्ष सुरु असलेली पालखी दि १६ रोजी ०४:०० वाजता मंदीरापासुन निघणार आहे यात्रेनिमित्त गावातील व परीसरातील भाविक येथे मानलेले नवस पूर्ण करतात. ज्या भक्तांनी बेडी मानलेली असते त्यांचा बेडीचा कार्यक्रम असतो, तोही येथे दरवर्षी मानलेला नवस पूर्ण केला जातो. गावात यात्रेनिमित्त पाळणे, खेळणीचे दुकाने रेवडीचे व मिठाई हाटेल ची दुकाने थाटण्यात आली आहेत. येथील पालखी रात्री पर्यंत चालते घरोघरी पालखीचे पुजन केले जाते दत्त जयंतीच्या निमित्ताने मोठा वाघोदा येथील दोन तीन दिवसीय यात्रा भरते.  हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात गावात यात्रेमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री कृष्ण ज्ञान मंदिर मोठा मठ व श्री दत्त मंदिर लहान मठ या दोन्ही मंदिराच्या संयुक्त विद्यमाने यात्रा महोत्सव संपन्न होतो तरी भाविक भक्तांनी दर्शन महाप्रसाद पालखी सोहळा च्या लाभ घ्यावा असे आव्हान आचार्य वाघोदेकर बाबा शास्त्री मोठा मठसंचालक यांनी केले आहे

No comments