adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"महिला सुरक्षा काळाची गरज " नाटिकेचा प्रथम क्रमांक

 "महिला सुरक्षा काळाची गरज " नाटिकेचा प्रथम क्रमांक  संगमनेर तालुका प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड)   वडगावपान बीटस्तरीय वि...

 "महिला सुरक्षा काळाची गरज " नाटिकेचा प्रथम क्रमांक 


संगमनेर तालुका प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

  वडगावपान बीटस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा नुकत्याच मनोली येथे पार पडल्या

या स्पर्धेत वडगावपान, जोर्वे, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द,पिंपरी लौकी आजमपूर  या केंद्राचा समावेश होता.

 सदर स्पर्धेत सांस्कृतिक गटात  "महिला सुरक्षा काळाची गरज" वडगावपान शाळेच्या नाटिकेचा बालगटात प्रथम क्रमांक आला.तालुका स्पर्धेसाठी नाटिकेची निवड झाली आहे. याबद्दल 

संगमनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब गुंड साहेब शिक्षण विस्तार अधिकारी श्री. दिपक त्रिभुवन साहेब, केंद्रप्रमुख आशा घुले मॅडम तसेच सरपंच , उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, पालक , ग्रामस्थ व शि.वि.अधिकारी श्रीम.कलगुंडे मॅडम व विषयतज्ज्ञ श्री. योगेश मोरे यांनी जि.प.प्राथ.केंद्र शाळा वडगावपान शाळेतील नाटिकेतील सहभागी विद्यार्थ्यांचे , मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व  अभिनंदन केले.

No comments