adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ललकारी सन्मानाची संतोष आमले यांना राज्यस्तरीय जनसेवा सन्मान पुरस्कार जाहीर

  ललकारी सन्मानाची  संतोष आमले यांना राज्यस्तरीय जनसेवा सन्मान पुरस्कार जाहीर संतोष आमले सर जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -:-ह...

 ललकारी सन्मानाची  संतोष आमले यांना राज्यस्तरीय जनसेवा सन्मान पुरस्कार जाहीर

संतोष आमले सर

जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

ललकारी सन्मानाची  राज्यस्तरीय जनसेवा सन्मान पुरस्कार सोहळा  मुंबई येथे 29  डिसेंबर रोजी होणारा आहे. ह्या  पुरस्कार सोहळा मध्ये अनेक नामवंत व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या नामवंत व्यक्तीमध्ये  दैनिक युवक आधार चे संपादक 

संतोष आमले ह्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.  संतोष आमले हे दैनिक युवक आधार चे संपादक असुन व दादासाहेब फाळके चित्रपट युनियन चे रायगड जिल्हा अध्यक्ष  देखिल आहेत. संतोष आमले साहेबांचा  सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये सामाजिक कार्याचे काम  उत्कृष्ट असून त्यांचा सामाजिक बांधिलकीचा  जन संपर्क ही  दांडगा आहे. आपल्या लेखणीच्या जोरावर अनेक चांगले संपादकीय लेख  दैनिक युवक आधार मध्ये लिहितात. अवघ्या काही महिन्यात संपुर्ण महाराष्ट्रात दैनिक युवक आधार चे नाव लौकिक झाले आहे. अनेक जिल्ह्यांत दैनिक दैनिक युवक आधारचे 

 प्रतिनिधी व पदाधिकारी कार्यरत आहेत. खरं तर हे खुप अभिमास्पद बाब  आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार व कलाकार त्यांची सांगड घालत   व्यक्ती म्हणून त्यांचे  नावलौकिक झालेले आहे. त्यांनी  मुलाखती वेळी  दिलेली ही माहिती आहे.  हे आमच्यासाठी  आनंदाचे क्षण असून सर्वं  दादासाहेब फाळके युनियन मधील  कलाकार सदस्य आणि दैनिक युवक आधार चे पत्रकार व प्रतिनिधी व पदाधिकारी  यांच्याकडून  संतोष आमले साहेबांचे  खुप कौतुक होत आहे.हा राज्यस्तरीय पुरस्कार  देऊन  कार्याची उंची वाढवल्याबद्दल एन डी खान यांचे व टि. एम. जी क्रिएशन्स आणि इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशनचे संतोष आमले आणि त्यांची टीम  यांनी मानले आभार.

No comments