adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रिपाई आंबेडकर पक्षाच्या व भीमसैनिकांच्या वतीने परभणीच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत नगर शहरातून भव्य मोर्चा…

  रिपाई आंबेडकर पक्षाच्या व भीमसैनिकांच्या वतीने परभणीच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत नगर शहरातून भव्य मोर्चा… नगर (प्रतिनिधी):- (संपादक -:-ह...

 रिपाई आंबेडकर पक्षाच्या व भीमसैनिकांच्या वतीने परभणीच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत नगर शहरातून भव्य मोर्चा…


नगर (प्रतिनिधी):-

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

परभणी जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील संविधान प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकास व इतर गुन्हेगारास देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी व पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू पावलेला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यास चौकशी करून अटक करण्यात यावी व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपाई आंबेडकर पक्ष व समस्त भीमसैनिकाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला व कोतवाली पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक यांना रिपाई आंबेडकर पक्षाचे अहिल्यानगर संपर्कप्रमुख रोहित आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,परभणी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील संविधान प्रतिमेची तोडफोड करून समस्त आंबेडकरी अनुयायाची भावना दुखावली गेली.एलएलबी शिक्षण घेणाऱ्या व शांततेच्या माध्यमाने आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकास ताब्यात घेऊन त्याला अटक केली.त्यास अमानुषपणे मारहाण करण्यात आली व त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी व मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये शासनाने मदत जाहीर करावी व कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

No comments