अनवर्दे खुर्दे ता.चोपडा येथील जगदीश युवराज तायडे यांची महाराष्ट्र राज्य लेव्हलवर महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी म्हणून नियुक्ती अखिल स्तरीय मह...
अनवर्दे खुर्दे ता.चोपडा येथील जगदीश युवराज तायडे यांची महाराष्ट्र राज्य लेव्हलवर महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी म्हणून नियुक्ती
अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य
जळगांव प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
शिर्डी येथे महाराष्ट्र राज्यातील महा-ई-सेवा केंद्र चालकांचे व आधार सेवा केंद्र चालकांचे एक दिवसीय शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यांत आले होते.यात जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्दे येथील आपले सरकार सेवा केंद्र संचालक जगदीश युवराज तायडे यांची अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य अंतर्गत जळगांव जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य लेव्हलवर महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यांत आली आहे.राज्यातील सेतू चालकांचा तसेच सेतू संचालक यांच्या कुटुंबांचा महाराष्ट्र राज्य शासनामार्फत विमा काढण्यात यावा,नविन सेतू कार्यालयाचे वाटप करु नये,आधार केंद्र संचालक जे ऑपरटेर आहेत त्यांना ब्लॅक लिस्ट करण्याआधी नोटीस देण्यात यावी,आधार कार्डचे जे कमिशन बाकी आहे ते कमिशन तात्काळ मिळावे,महा-ई-सेवा केंद्र संचालक यांना ग्रामपंचायतीचे संगणक चालकांप्रमाणे दर महिन्याला मानधन मिळावे अशा मागण्यांचा ठराव अधिवेशनात करण्यांत आला आहे.महा-ई-सेवा केंद्र संचालकांचे संघटनेचे राज्याध्यक्ष ज्ञानेश्वर धाबे,विनोद तायडे,उमंग शहा, श्री.गावंडे,नंदाताई कोठले,शैलेन्द्र भोईटे उपस्थित होते.अधिवेशन यशस्वीतेसाठी लुकेश शिंदे,कुंदन कोरडे व आनंद दळवी आदींनी परिश्रम घेतले.

No comments