adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

परभणी येथे झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रतिकात्मक संविधान पत्रीकेची विटबंना बाबतीत जामनेर येथे सामाजिक स्थरातून भिमसैनिकांचा निषेध...

  परभणी येथे झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रतिकात्मक संविधान पत्रीकेची विटबंना बाबतीत जामनेर येथे सामाजिक स्थरातून भिम...

 परभणी येथे झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रतिकात्मक संविधान पत्रीकेची विटबंना बाबतीत जामनेर येथे सामाजिक स्थरातून भिमसैनिकांचा निषेध...


जामनेर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रतिकात्मक संविधान पत्रीकेची विटबंना व नासधुस करणार्या समाज कंटकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी आज रोजी जामनेर पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय येथे सामाजिक स्थरातून निवेदन देण्यात आले आहे. सविस्तर असे की दि.१०/१२/२०२४ रोजी परभणी येथे झालेल्या घटने बाबतीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रतिकात्मक संविधान पत्रीकेची विटबंना करून नासधूस करणार्या नराधमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा


यासाठी सामाजिक स्थरातून भिमसैनिकांनी जामनेर येथे निषेध मोर्चा काढलाआहे या निषेधा मार्फत जामनेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सागर काळे व तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. संबंधित नराधमाला अटक आणि निवेदनाची दखल न घेतल्यास जामनेर तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा देण्यात आला

व होणार्या परिणामाला शासन जबाबदार राहील. निवेदन देते वेळी रत्नाकर जोहरे, राहुल इंगळे, योगेश लोखंडे,रवि मोरे,पिंटू जोहरे, अविनाश जोहरे, ज्ञानेश्वर जोहरे,गौतम वाघ,मिलींद सपकाळे,दादाराव इंगळे, सिद्धार्थ सुरवाडे,पवन साळवे,अक्षय वाघ, स्वप्निल मोरे,गोपाळ सपकाळे, सुभाष अहिरे,गौतम सुरवाडे आदि सामाजिक संघटनेतील कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments