महसूल सेवक (कोतवाल) काही ठिकाणी आपल्या मागण्या मागत मागत सेवानिवृत्त झालेत यानिमित्ताने त्यांच्या व्यथा मांडण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न...
महसूल सेवक (कोतवाल) काही ठिकाणी आपल्या मागण्या मागत मागत सेवानिवृत्त झालेत
यानिमित्ताने त्यांच्या व्यथा मांडण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न
आज ३१ डिसेंबर २०२४ सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं सहर्ष स्वागत करीत आनंदात काही जण साजरे करतात तर काही जण आपल्या नोकरी रुपी सेवेतून सेवानिवृत्त होतात अशीच एक सेवा देणारे आमचे काही कोतवाल बंधू आज सेवा निवृत्त झाले असल्याचे समजते चोपडा,अंबड, गोंदिया अश्या ठिकाणी आपल्या आयुष्याचे पंचवीस,तिस वर्ष सेवा देवून आज ३१ डिसेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त होवून रिकाम्या हाताने सेवानिवृत्त झाल्याच्या वृत्ताने मन हेलावून गेले जि माणसं कायम सेवेत तत्पर असतात त्यांना त्यांच्या गरजा पहाता सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांचे पुढील आयुष्य उत्तम प्रकारे जगता यावं हिच अपेक्षा आज काही ठिकाणी कोतवाल बंधू सेवा निवृत्त झालेत त्यात आज रोजी चोपडा तालुका जिल्हा जळगाव येथील महसूल सेवक श्री लालदास सोनवणे हे गेली अठ्ठावीस वर्षे सेवा करून रिकाम्या हाती रिटायर झाले त्यांना चोपडा तालुका संघटना कडून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यावेळी मा. तहसीलदार साहेब व नायब तहसीलदार व तलाठी व महसूल सेवक हे उपस्थित होते तर सेवानिवृत्त श्री जगदीश जी मेश्राम महसूल सेवक गोंदिया यांच्या आज वयोमानानुसार सेवानिवृत्त कार्यक्रम उपविभागीय कार्यालय गोंदिया येथे संपन्न झाला आहे. तसेच आज दिनांक ३१ डिसेंबर २०२४ वर्षाच्या अखेरच्या दिवशी आपल्या सर्वांचे वरिष्ठ अंबड साज्याचे महसूल सेवक श्री पठाण साहेब हे सेवानिवृत्त झाल्यामुळे सेवानिवृत्ती कार्यक्रम घेण्यात आला त्यानिमित्ताने श्री पठाण साहेब यांचा शाल, श्रीफळ, देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी माननीय तहसीलदार साहेब श्री विजय चव्हाण सर तसेच नायब तहसीलदार गिरगे सर विवेक उढाण सर तसेच तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरोटे सर तलाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष जाधव सर अंबड चे तलाठी श्री विठ्ठलराव गाडेकर सर व इतर तलाठी साहेब देखील हजर होते तसेच इतर कर्मचारी वृंद आणि महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष धारे भाऊजी सर्व महसूल सेवक सुद्धा हजर होते सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेब यांनी पठाण साहेब यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व श्री पठाण साहेब यांना सेवा गौरव म्हणून तलाठी संघटना तर्फे सर्व तलाठी मिळून एकूण ३५ व आणखी १५००० हजारअसे ऐकून ५०००० रुपयांची भेट देण्यात आली त्या निमित्ताने श्री पठाण साहेब व सर्व महसूल सेवकांनी तलाठी संघटनेचे सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त केले विशेष म्हणजे बरेचसे वेळी कोतवाल बंधू यांनी चतुर्थी श्रेणी व पेंशन साठी या मागण्या केल्या आहेत त्या अश्या १) अटल पेंशन नसलेल्या महसूल सेवक यांना पेंशन मिळाली पाहिजे २) महसूल सेवक यांना १० % वाढ हि दर वर्षी झाली पाहिजे ३) महसूल सेवक यांना पंचवीस हजार रुपये मानधन वाढ झाली पाहिजे ४) सेवा निवृत्त वय ६० वर्षे एवजी ६५ वर्षे झाले पाहिजे अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा वर्कर यांच्या प्रमाणे ५) सेवा निवृत्त महसूल सेवक यांना पेंशन किंवा निर्वाह भत्ता मिळावा अशा मागण्या केल्या आहेत तर महाराष्ट्र राज्यातील महसूल सेवक यांची ४०-५० वर्षापासून प्रलंबित असणारी चतुर्थ श्रेणीची मागणी अजूनही शासनाने पूर्ण केलेली नाही. याउलट १०% मानधन वाढ व तेही २०२६ पासून लागू केल्याने राज्यातील महसूल सेवक यांच्यावर अन्यायकारक निर्णय झाल्याने शासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन हि देण्यात आले होते यामध्ये प्रमुख मागण्या राज्यातील महसूल सेवक यांना विनाविलंब चतुर्थ श्रेणी दर्जा लागू करावा. १) सेवा निवृत्त महसूल सेवक यांना पेन्शन सुरू करावी व अंगणवाडी सेविका प्रमाणे सेवा निवृत्त वय ६० वरून ६५ वर्ष करावे. २) ग्राम महसूल अधिकारी व महसूल सहाय्यक यामधे ५०% आरक्षण देण्यात यावे दि. ०७/१०/२०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णय मानधन वाढ ही चालु वर्षापासून लागू करावी. दर ३ वर्षा ऐवजी ती १०% मानधन वाढ दरवर्षी लागू करावी तसेच ११ डिसेंबर रोजी निघालेले राजपत्र मध्ये पदोन्नतीसाठी ५० वर्ष वयोमर्यादा कायम करून इतर अटी रद्द करण्यात याव्यात. ५) पदोन्नती कोठा ४०% वरून १०० टक्के करावा अश्या मागण्याही करण्यात आल्या आहेत तर आंदोलन केले आहे कोतवाल हे पद ब्रिटिश काळापासून आहे तरी त्यांना पेंशन नाही वेळोवेळी संघटने कडून आंदोलने झालीत पण सध्यातरी ह्या विषयावर चर्चा होणे गरजेचे असुन भविष्यात सेवानिवृत्त होणारे कर्मचारीं वंचित राहू नयेत हिच अपेक्षा
संकलन
शामसुंदर सोनवणे
व्यवस्थापकीय संपादक नेशन महाराष्ट्र
मो.8208449983
No comments