Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गणपुर रस्त्याला वेढलय काटेरी झुडपांनी वळणदारी रस्ते असल्याने अपघात होण्याची शक्यता ?

  गणपुर रस्त्याला वेढलय काटेरी झुडपांनी वळणदारी रस्ते असल्याने अपघात होण्याची शक्यता ? काल्पनिक फाईल चित्र  गलंगी प्रतिनिधी (संपादक -:-हेमका...

 गणपुर रस्त्याला वेढलय काटेरी झुडपांनी वळणदारी रस्ते असल्याने अपघात होण्याची शक्यता ?

काल्पनिक फाईल चित्र 

गलंगी प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

गलंगी ता. चोपडा पासून जवळच असलेले गणपुर  या ठिकाणी जाण्यासाठी कठीणच झाले. असून आजूबाजूला सर्व काटेरी झुडपांनी घेराव करून ठेवलेला आहे गणपुर हे गाव गलंगी पासून फक्त तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे.तर पूर्ण रस्ता हा वळणदार असल्यामुळे समोरील वाहन दिसणं कठीण आधीच रस्ता वळणदारीचा त्यात काटेरी झुडपे असल्यामुळे समोरचे वाहन दिसत नसल्यामुळे कित्येक वेळा छोटा मोठा अपघात पाहण्यास तर ऐकण्यात ही मिळतो तरी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन काटेरी झुडपे काढून रस्ता मोकळा करावा. अशी मागणी वाहनधारक व भवाळे गणपुर येथील नागरिक करताना दिसून येत आहेत तर सदरील रस्ता एकमेव असल्यामुळे दवाखाना, शेतकऱ्यांच्या माल ने आण करणे वाहतुकिस , शाळेचे विद्यार्थी हे सकाळी सकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान घराबाहेर पडत असतात या रस्त्यामुळे फार मोठी अडचण निर्माण होत आहे.तरी काटेरी झुडपांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. याकरिता त्वरीत झुडपे काढण्यात यावी.अशी मागणी परिसरातील वाहनचालक, ग्रामस्थांनी केली आहे 

No comments