संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे शिव महापुराण कथा च...
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे शिव महापुराण कथा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने तेली समाज मंगल कार्यालय, संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे शिव महापुराण कथा सुरू आहे. हरिद्वार निवासी आचार्य पंडित मनोज भास्कर महाराज यांच्या अमृतवाणी द्वारे शिवमहापुराण कथेचे रसपान शिवभक्त करीत आहेत. या कथेला आज जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष चोपडे शहराचे माजी नगराध्यक्ष तथा महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट भैय्यासाहेब श्री संदीप सुरेश पाटील यांनी उपस्थिती देऊन कथा श्रवणाचा लाभ घेतला. यावेळी आचार्य मनोज जी भास्कर यांनी त्यांच्या परिवाराचा गौरव करून संस्काराचे महत्त्व पटवून दिले व त्यांचा यथोचित सत्कार सन्मान केला. श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज या संस्थेतर्फे उपस्थित आमचे आभार मानण्यात आले.

No comments