डोंगराळ भागातील ४गावठी दारुच्या हातभट्टया उध्वस्त सपोनि विशाल पाटील यांची सलग ५ तासांची शोध मोहीम यशस्वी रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (सं...
डोंगराळ भागातील ४गावठी दारुच्या हातभट्टया उध्वस्त
सपोनि विशाल पाटील यांची सलग ५ तासांची शोध मोहीम यशस्वी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सातपुडा पर्वताच्या रांगेतील डोंगराळ परिसरात सकाळपासूनच सलग ५ तास जंगलामध्ये शोध घेत धाड टाकून ४ गावठी हातभट्ट्या नष्ट करण्यात सावदा पोलिसांना यश आले आज रोजी सावदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रावेर तालुक्यातील पाल घाटाखालील जानोरी शिवारातील डोंगराळ जंगलामधे ४ गावठी हातभट्यावर तयार केली जात असलेली
गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली असून त्याबाबत संबंधित आरोपींवर सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आली या पुढेही गावठी दारू निर्मिती व विक्री करणार्यांवर अशीच कारवाई चालू राहणार असल्याचे सावदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले आहे. सदरची कारवाई ही वरिष्टांचे आदेशान्वये सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, सहायक फौजदार खोडपे, पोलीस नाईक निलेश बाविस्कर, पोलीस नाईक सैंदाने, पोलिस नाईक मेहरबान तडवी, पो कॉ जोशी यांचे पथकाने केली


No comments