जागतिक ध्यान दिनानिमित्त 'चला सहजयोग ध्यान शिकू या' ईदू पिंजारी फैजपुर-:- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा सहजयोग ट्रस्ट द...
जागतिक ध्यान दिनानिमित्त 'चला सहजयोग ध्यान शिकू या'
ईदू पिंजारी फैजपुर-:-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा सहजयोग ट्रस्ट द्वारे आव्हाहन करण्यात येते की संयुक्त राष्ट्र संघाने नुकतेच दिनांक २१ डिसेंबर हा दिवस "जागतिक ध्यान दिन" म्हणून साजरा करण्याचे सर्व देशांना आव्हाहन केले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहज योग ध्यानाद्वारे ध्यानधारणा करावी. सहज योग ध्यानाद्वारे शारीरिक व मानसिक संतुलन प्राप्त होऊन व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो.
ध्यान कसे करावे ? ध्यान कुठे करावे? ध्यान किती वेळ करावे ? ध्यान करताना नेमके काय करावे? ध्यानात काय साध्य होते. कशाप्रकारे अनुभूती आली म्हणजे ध्यान झाले. कुठल्या प्रकारच्या ध्यानाने फायदा होतो. याबाबत सविस्तर मार्गदर्शन सहज योग ध्यानातून करण्यात येते.
सहज योग ध्यानाच्या संस्थापिका परम पूज्य श्री. माताजी निर्मला देवी आहेत. त्यांनी ५ मे १९७० रोजी सहज योग ध्यानाची स्थापना करून अवघ्या विश्वात या ध्यानाचा प्रसार केला. हे ध्यान सर्व विश्वात विविध देशांमध्ये केले जाते. या ध्यानातून अनेक साधकांनी आपला सर्वांगीण विकास साध्य केला आहे. सदर सहजयोग ध्यान धर्मनिरपेक्ष असून सर्व समावेशक आहे. यातून व्यक्तीचा अंतर - बाह्य विकास होऊन व्यक्तीची निर्णय क्षमता वाढते. संतुलित जीवन प्राप्त होऊन शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सदृढ होते.
श्री. माताजींच्या मते “मेडिटेशन म्हणजे निर्विचारिता प्राप्त करणे होय.” सदर ध्यान सहज योग सेंटरला येऊन सामूहिकतेत केल्याने त्याचे प्रचंड फायदे झाले आहे. असा विश्वातील विविध सहज योगी बंधू-भगिनींचा अनुभव आहे. भुसावळ येथे सहजयोग ध्यान म्युन्सिपल हायस्कूल, जामनेर रोड भुसावळ येथे नियमित शनिवार रोजी सायंकाळी ०६:३० ते ०८:३० या वेळेत करतात. जळगाव येथे रत्नाभाभी जैन विद्यालयात नियमित रविवारी सायंकाळी ०६:३० ते ०८:०० या वेळेत करतात. सहजयोग ध्यानधारणा ही सर्व जाती, धर्माच्या व सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी विनामूल्य आहे. हे ध्यान सहजपणे करता येते. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे व्यायाम करावे लागत नाही. हे साधे सोपे ध्यान आहे.
दिनांक २१ डिसेंबर २०२४ वार शनिवार रोजी आंतरराष्ट्रीय ध्यान दिनानिमित्त सायंकाळी ०६:३० वाजता सामूहिक आत्मसाक्षात्काराचा व सामूहिक ध्यानाचा कार्यक्रम म्युन्सिपल हायस्कूल, जामनेर रोड भुसावळ येथे होईल. ज्यांना ध्यानधारणा शिकायची आहे; त्यांनी सायंकाळी ०६:३० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन परमपूज्य माताजी श्री. निर्मला देवी प्रणित सहजयोग ध्यान केंद्र भुसावळ तर्फे करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय ध्यान दिवसाचे औचित्य साधून सर्वांनी आपले मानसिक व शारीरिक संतुलन करून घेऊया. चला सहज योग ध्यान शिकूया.
!! जय श्री माताजी!!

No comments