महावितरण ला एसीबी चा झटका अभियंता तंत्रज्ञसह लाईनमन अटकेत ४ हजाराच्या लाचेत करंट रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
महावितरण ला एसीबी चा झटका अभियंता तंत्रज्ञसह लाईनमन अटकेत ४ हजाराच्या लाचेत करंट
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
१९ डिसेंबर २०२४ वीज कंपनीच्या भुसावळ आणि सावदा विभागातील रहिवासी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जुन्या मीटरमध्ये बिघाड झाल्याने नवीन मीटर खरेदी केले. बसविल्यानंतर जुन्या मीटरचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी २० हजार आणि नंतर १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. वीज मीटर जळगाव एसीबीने गुरुवारी १९ रोजी दुपारी ०२:०० वाजता कार्यालयातून एका महिला अधिकाऱ्यासह लाइनमन आणि वरिष्ठ तंत्रज्ञ यांना अटक केली. हा प्रकार होताच वीज कंपनीतील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. सहायक अभियंता कविता भारत सोनवणे (४२, हुडको कॉलनी, भुसावळ), लाइनमन संतोष सुकदेव इंगळे (४५, मल्हार कॉलनी, फैजपूर) आणि वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी (३९, अयोध्यानगर, भुसावळ) अशी अटक केलेल्या लाचखोरांची नावे आहेत. हे तिन्ही लाचखोर सावदा विभागाच्या पाडळसा सेल कार्यालयात कार्यरत आहेत.
असेच एक प्रकरण लाचखोरीचे आहे.
३४ तक्रारदार हे भुसावळ तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक आहेत. तक्रारदाराच्या वतीने सकारात्मक अहवाल पाठविण्याच्या बदल्यात तिन्ही आरोपींनी त्यांच्या हॉटेलमधील जुने मीटर काढून नवीन वीज मीटर बसविण्याच्या बहाण्याने बुधवारी १८ रोजी प्रथम २० हजार व नंतर १५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने चार हजार रुपये देण्याचे मान्य केल्याने एसीबीकडे तक्रार करण्यात आली. गुरुवारी दुपारी दोन वाजता आरोपी संतोष इंगळे याने लाच घेताच त्याला अटक करण्यात आली व नंतर अन्य दोन आरोपींनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments