adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बियरबार फोडुन महागड्या किमंतीच्या देशी विदेशी दारु चोरी करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

  बियरबार फोडुन महागड्या किमंतीच्या देशी विदेशी दारु चोरी करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात पारोळा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड...

 बियरबार फोडुन महागड्या किमंतीच्या देशी विदेशी दारु चोरी करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात


पारोळा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

दिनांक ०४/०८/२०२४ रोजी पारोळा शहरातील हॉटेल ग्रिन पार्क बियरबारचे कुलूप तोडुन महागड्या किमंतीच्या देशी विदेशी दारु चोरी केल्यावरुन पारोळा पो.स्टे.CCTNS NO २५३/२०२४ भा.न्या.संहिता ३३१ (४),३०५ प्रमाणे दिनांक ०४/०८/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली असता सदर गुन्हा करतांना वापरलेली गुन्ह्याची पध्दत ही यापुर्वीचा रेकॉर्ड वरील आरोपी शान्या ऊर्फे शांताराम प्रताप कोळी रा.हातेड ता.चोपडा याने केल्याची वाटत असल्याने त्याच्यावर संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असुन आरोपी नामे शान्या ऊर्फे शांताराम प्रताप कोळी यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी पारोळा पो.स्टे.CCTNS NO २५३/२०२४ भा.न्या.संहिता ३३१ (४),३०५ या गुन्ह्यात पारोळा पो.स्टे.ला जमा करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोउपनि गणेश वाघमारे,पोह संदिप पाटील,प्रविण मांडोळे,नंदलाल पाटील,भगवान पाटील,राहुल कोळी,सर्व नेम.स्थागुशा जळगाव अश्यांनी केली आहे.सदरची कारवाई डॉ.महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक,जळगाव,कविता नेरकर अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव,बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, स्थागुशा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

No comments