सहकार भारती तालुका निहाय कार्यकारणी होणार जिल्हाध्यक्ष- नरेंद्र नारखेडे इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) सहकार चळवळ मजबूत ह...
सहकार भारती तालुका निहाय कार्यकारणी होणार जिल्हाध्यक्ष- नरेंद्र नारखेडे
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
सहकार चळवळ मजबूत होणे साठी व ग्रामीण भागात सहकार रुजविण्यासाठी सहकार भारती लवकरच तालुका निहाय कार्यकारी समिती रचना करणार असल्याची माहिती सहकार भारती जळगाव जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली सहकार भारतीची जिल्हा बैठक नुकतीच नरेंद्र नारखेडे यांचे अध्यक्षतेखाली जळगाव जनता बँकेचे सभागृहात संपन्न झाली सभेत नुकतेच सहकार भारतीचे राष्ट्रीय अधिवेशन मा. ना. नितीन गडकरी यांचे उपस्थितीमध्ये अमृतसर येथे पार पडले या अधिवेशनात झालेले ठराव वृत्तांत नवनिर्वाचित राष्ट्रीय मंत्री दिलीप रामू पाटील व राष्ट्रीय महिला प्रमुख सौ रेवती ताई शेंदूरणीकर यांनी सादर केला याप्रसंगी दिलीप पाटील वर येवती ताई यांचा राष्ट्रीय पातळीवरील निवडी बद्दल सत्कार जनता बँक चेअरमन सतीश दादा मदाने यांचे हस्ते करण्यात आला सहकार भारतीचे वर्धापन दिनाचे निमित्त जानेवारी महिन्यात सप्ताहात सहकार मेळावे व परिषदांचे आयोजन जिल्ह्यात आयोजित होणार असून वि.का सहकारी संस्थांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारने आणलेल्या नवीन योजना राबविण्यात येणार आहे सभेस नाशिक विभाग प्रमुख शरद जाधव यांनी संस्थेच्या ध्येय धोरण बाबत मार्गदर्शन केले महामंत्री शशिकांत बेर्डे यांनी सूत्रसंचालन केले सभेस उपाध्यक्ष सुधीर आबा पाटील चाळीसगाव सचिव विकास देवकर जळगाव महानगर अध्यक्ष शोभाताई पाटील राजेंद्र केले मंगलदास भाटिया प्रवीण नाना पाटील निरीक्षक अंधुरेकर धनंजय फिरके सुरेखा पाटील मनीषा खडके विभा कुरमभट्टी कर जयदीप शहा प्रवीण गडे आशुतोष अडवडकर यांचेसह यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

No comments