परभणी घटनेचा रावेर ला निषेध मोर्चा काढून निषेध रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ...
परभणी घटनेचा रावेर ला निषेध मोर्चा काढून निषेध
रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ समाज बांधव तसेच एन एसयूआय यांच्या संयुक्त रॅलीने हातात संविधान घेऊन रावेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी परभणी येथील घटनेचा निषेध जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने करीत करण्यात आला.
एनएसयूआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी यांच्या हस्ते रावेर येथील मुख्य चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करून निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला तसेच परभणी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.रावेर चे तहसीलदार बंडू कापसे यांना निवेदन ्देण्यात आले. व भारताचे गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही यावेळी करण्यात आला.
या निषेध मोर्चा त एनएसयूआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, सावन मेढे,
संघरक्षक तायडे, दिलीप कांबळे, बाळू शिरतुरे, रामभाऊ वाघोदे, गजरे, बाळू शिरतुरे, प्रदीप सपकाळे, विनोद मोरे, संघरत्न दामोदरे, विजय अवसरमल, प्रशांत गाढे, साहेबराव वानखेडे, जगदीश घेटे, धनराज घेटे, प्रकाश महाले आदींच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन देण्यात आले


No comments