Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्या २ ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे छापे;१ लाख ७९,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त;५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

  सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्या २ ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे छापे;१ लाख ७९,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त; ५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाख...

 सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्या २ ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे छापे;१ लाख ७९,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त;

५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल


अहिल्यानगर (दि.३० प्रतिनिधी):-

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

पाथर्डी शहरात सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्या २ ठिकाणी 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत आरोपीं कडून १ लाख ७९,०००/-रूपये. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवर कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. नमुद आदेशाप्रमाणे सपोनि/हेमंत थोरात, अतिरीक्त कार्यभार यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे,अतुल लोटके, पंकज व्यवहारे,संतोष खैरे,रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे,सागर ससाणे,जालींदर माने व महादेव भांड अशांचे पथक तयार करून पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन त्यांचे विरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले होते.दि.३० डिसेंबर रोजी पथकातील पोलीस अंमलदार यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल अशा खादयपदार्थ सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढुन, पंचासमक्ष ०२ वेगवेगळया ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली.त्यामध्ये पाथर्डी पोलीस स्टेशनला ५ आरोपी विरूध्द २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरोपीचे ताब्यातुन विविध कंपनीची सुगंधीत तंबाखुच्या पिशव्या असा १,७९,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई श्री. राकेश ओला,पोलीस अधीक्षक,अहिल्यानग,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगाव उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments