अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण संप...
अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
डिफेन्स,एस.के, हुंडेकरी,प्रियदर्शनी क्रिकेट ॲकॅडमीने मिळविले विजेतेपद;वाडिया पार्क मैदानातील टर्फ विकेट व फ्लड लाईट चे काम मार्गी लागणार-आ.संग्राम जगताप
अहिल्यानगर प्रतिनिधी:-
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
वाकोडी येथील साईदीप मैदानावर जिल्हास्तरीय बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धा २३ दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रत्येक सामना अटीतटीचा व शेवटच्या षटकापर्यंत चालला असून खेळाडूंनी क्रिकेट प्रेमींचे मने जिंकली. या स्पर्धेमध्ये १२ वर्षाखालील वयोगटातील अंतिम सामना डिफेन्स क्रिकेट ॲकॅडमी विरुद्ध हुंडेकरी क्रिकेट ॲकॅडमी यांच्या मध्ये चुरशीचा झाला असून यामध्ये डिफेन्स क्रिकेट अकॅडमी ने विजेते पद मिळविले तसेच १४ वर्ष वयोगटाखाली अंतिम सामना एस.के क्रिकेट अकॅडमी व समर्थ क्रिकेट ॲकॅडमी मध्ये झाला असून एस.के क्रिकेट अकॅडमी ने विजेतेपद मिळविले तसेच १६ वर्ष वयोगटाखालील अंतिम सामना हुंडेकरी क्रिकेट ॲकॅडमी व एस.के क्रिकेट अकॅडमी मध्ये झाला असून हुंडेकरी क्रिकेट ॲकॅडमी ने विजेतेपद मिळविले याचबरोबर १९ वर्षाखालील वयोगटातील अंतिम सामना प्रियदर्शनी क्रिकेट ॲकॅडमी आणि आर.एल क्रिकेट अकॅडमी यांच्यामध्ये झाला असून प्रियदर्शनी क्रिकेट ॲकॅडमी संघाने विजेते पट मिळविले असल्याची माहिती आयोजक कपिल पवार यांनी दिली.अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सी.ए अशोक पितळे.गौतम सुवर्ण पाठकी,आयोजक कपिल पवार,नायब तहसिलदार विजय धोत्रे, सम्राट देशमुख, ज्ञानेश चव्हाण,माजी नगरसेवक विजय गव्हाळे,अक्षय तोडमल,गौरव पितळे, राहुल पवार,रमेश सुपेकर,अरुण नाणेकर, संदीप पवार,उमेश ठाणगे,गौतम शिंगवी, अजय कविटकर,दिलीप पवार,प्रशांत अंतेपेलू,, सोमनाथ नजान, निखील पवार , सागर बनसोडे अदीसह क्रिकेट प्रेमी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार संग्राम जगताप म्हणाले की जिल्ह्यामध्ये नामवंत खेळाडू म्हणून कै.बाळासाहेब पवार यांची ओळख होती नगर जिल्ह्यासह शहरातील क्रिकेट खेळाडू साठी इलेव्हन संघाची स्थापना केली.त्यानंतर क्रॉम्प्टन क्रिकेट करंडक सुरू केला आणि त्या माध्यमातून खेळाडूंना आपल्या खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे स्पर्धेचा दर्जा उंचविला आहे. त्यातून चांगले खेळाडू निर्माण झाले कपिल पवार हा देखील चांगला खेळाडू असून त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाने क्रिकेटचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहे. वाडिया पार्क फक्त नावाला क्रीडा संकुल होते आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाचे मैदान निर्माण होणार आहे.पहिल्या टप्प्यात टर्फ विकेट व फर्ल्ड लाईट चे काम मार्गी लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी संध्याकाळी क्रिकेटचे सामने खेळता येतील त्यातून नगरकर ही आनंद घेईल शहरात कधीही न झालेली कामे सुरू आहेत. सारसनगर परिसरामध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स चे काम अंतिम टप्प्यात आले आहे याचबरोबर सावेडी उपनगरामधील गंगा उद्यान परिसरात खेळाची मैदाने निर्माण होत आहे. आता विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा स्पर्धेमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध असून आपल्या आवडीच्या खेळामध्ये करिअर करावे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच विषयामध्ये काम सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
No comments