सावद्यात १०० रु.च्या बनावट नोटा चलनापुर्वीच दोघांना अटक सावदा पोलिसांनी जप्त केला ३७ हजारांचा मुद्देमाल छायाचित्रात सपोनि विशाल पाटील पी...
सावद्यात १०० रु.च्या बनावट नोटा चलनापुर्वीच दोघांना अटक
सावदा पोलिसांनी जप्त केला ३७ हजारांचा मुद्देमाल
![]() |
| छायाचित्रात सपोनि विशाल पाटील पीएसआय राहुल सानप फौजदार संजय देवरे पोलीस नाईक निलेश बाविस्कर पोहेकॉ संजीव चौधरी उमेश पाटील गोपनीय शाखेचे यशवंत टहाकळे आदीसह |
रावेर/ प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सावदा शहरात पोलिसांकडून बनावट नोटा चलनात येण्या आधीच सावदा पोलिसांनी शिताफीने पर्दाफाश केला असून याप्रकरणी सावदा येथील दोन जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे
सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना सावदा शहरात बनावट नोटा चलनात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर याच गोपनीय माहितीच्या आधारावर जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप सहाय्यक फौजदार संजय देवरे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीव चौधरी पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीव चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल यशवंत टहाकळे पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण पाटील पोलीस नाईक निलेश बाविस्कर यांचे पथक बनविले व सापळा रचत संशयित आरोपी शेख आरिफ शेख फारूक अझरखान अयुब खान दोघे राहणार सावदा यांना चलनी नोटांसह अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपींचा सहकारी असलेल्या एका व्यक्तीच्या शोधात पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली असून सदर प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे सावदा पोलीस स्टेशन हे करीत आहेत संशयित आरोपी कडून भारतीय बनावटीच्या १०० रुपये प्रमाणे दिसणाऱ्या चलनी नोटा व एक मोटरसायकल असा एकूण ३७ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल सावदा पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.

No comments