इंजि.सौ.कोमलताई तायडे यांच्या एस.के.स्क्वेअर एंटरप्राईजेस २०२५ च्या कॅलेंडरचे कामगार मंत्री ना.आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते विमोचन अमोल ...
इंजि.सौ.कोमलताई तायडे यांच्या एस.के.स्क्वेअर एंटरप्राईजेस २०२५ च्या कॅलेंडरचे कामगार मंत्री ना.आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते विमोचन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मलकापूर -:-आपल्या कंपनीच्या कॅलेंडरवर १२ महानायीकांच्या जिवनपटाची माहिती प्रसारीत करीत त्यांच्या कार्याला आपण उजाळा दिला असून कॅलेंडरचा सर्वाधिक उपयोग हा महिला वर्गाकडून होत असून महिला वर्गाला महानायीकांच्या जिवनपटाची माहिती देवून समाज उपयोगी उपक्रम राबवित असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना.आकाशदादा फुंडकर यांनी एस.के.स्क्वेअर एंटरप्राईजेसच्या २०२५ च्या दिनदर्शिकेच्या विमोचन प्रसंगी केले.
इंजि.सौ.कोमलताई सचिन तायडे व मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव इंजि.सचिन तायडे हे संचालक असलेल्या एस.के.स्क्वेअर एंटरप्राईजेसच्या २०२५ च्या कॅलेंडरचे विमोचन आज २८ डिसेंबर रोजी राज्याचे कामगार मंत्री ना.आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदर कॅलेंडरचे वाचन केल्यानंतर ना.आकाशदादा यांनी हे कॅलेंडर दिनदर्शिकेसह विविध जाती-धर्मातील बारा महानायिकांच्या जिवनपटाची माहिती देणारे असल्याने अतिशय प्रेरणादायी असे कॅलेंडर तयार केल्याबद्दल एस.के.स्क्वेअरच्या संचालिका सौ.कोमलताईंचे सर्वप्रथम अभिनंदन केले. तसेच आपण महिलांना रोजगारासह स्वबळावर सन्मानाने जगण्यासाठी प्रेरणा देत असल्याने आपल्या या कार्यात आपण सदैव सोबत असू अशी ग्वाही दिली.
सदर कॅलेंडरमध्ये जानेवारी महिन्यात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊं, फेब्रुवारी महिन्यात सावित्रीबाई फुले, मार्च महिन्यात माता रमाई, एप्रिल महिन्यात संत जनाबाई, मे महिन्यात संत मुक्ताई, जुन महिन्यात महाराणी ताराबाई, जुलै महिन्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ऑगस्ट महिन्या फातीमाबी शेख, सप्टेंबर महिन्यात मुक्ता साळवे, ऑक्टोबर महिन्यात ताराबाई शिंदे, नोव्हेंबर महिन्यात बहिणाबाई चौधरी व डिसेंबर महिन्यात संत सोयराबाई यांच्याबद्दल थोडक्यात त्यांच्या जिवनपटाची माहिती विषद केली आहे.
या कॅलेंडरच्या माध्यमातून महान अशा संत, समाजसेविका, कवि, राजमाता, लेखीका, वेळप्रसंगी दुर्गेचे रूप धरण करणार्या व शत्रुंशी लढाई करणार्या अशा विविधांगी महानायीकांच्या जिवनपटाची माहिती उपलब्ध झाली असल्याने महिलांना देखील यातून नक्कीच प्रेरणा मिळेल, हा उपक्रम खरोखरच प्रशंसनीय असल्याचे मतही ना.फुंडकर यांनी मांडत या कॅलेंडरचे कौतुक केले. यावेळी इंजि.सचिन तायडे उपस्थित होते.
सौ.कोमलताई एस.के.स्क्वेअर एंटरप्राईजेसच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी कार्य करीत आहेत. त्यांच्या एस.के.स्क्वेअर एंटरप्राईजेसचे फॅक्ट्रीला मी नक्कीच भेट देणार असून तेथे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती जाणून घेईल. यासह या उपक्रमास माझ्याकडून जी मदत आवश्यक असेल ती देण्यासाठी आपण प्रयत्नरत राहू.
-ना.आकाशदादा फुंडकर
कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य
No comments