adds

Page Nav

HIDE
Friday, July 25

Pages

Subscribe Us

Advertisment

चाळीबिघा परिसरातील न.प.ची कुठलीही परवानगी न घेता बांधकाम उभारण्यात आलेल्या शांती आरोग्यम् हॉस्पिटलची चौकशी करण्यात यावी. प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख अजय टप यांची मागणी

  चाळीबिघा परिसरातील न.प.ची कुठलीही परवानगी न घेता बांधकाम उभारण्यात आलेल्या शांती आरोग्यम् हॉस्पिटलची चौकशी करण्यात यावी.  प्रहार जनशक्ती प...

 चाळीबिघा परिसरातील न.प.ची कुठलीही परवानगी न घेता बांधकाम उभारण्यात आलेल्या शांती आरोग्यम् हॉस्पिटलची चौकशी करण्यात यावी. 

प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख अजय टप यांची मागणी



अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

मलकापूर:- शहरातील चाळीसबिघा परिसरातील गणेशनगरस्थित हॉस्पीटलचे झालेले बांधकाम हे अवैध व न.प.ची कुठलीही परवानगी न घेता करण्यात आले असल्याने याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी न.प.मुख्याधिकारी, न.प.प्रशासक तथा तहसीलदार मलकापूर यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मलकापूर शहर न.प. हद्दीत येत असलेल्या चाळीसबिघा परिसरातील गणेश नगरस्थित गत् काही वर्षापुर्वी शांती आरोग्यम् हॉस्पीटलची बिल्डींग उभारण्यात आली आहे. सदर बांधकाम करतेवेळी या हॉस्पीटलच्या बांधकाम कामाबाबत न.प. मधून कुठलीही बांधकाम परवानगी घेण्यात आली नसल्याचे समजते. सदर हॉस्पीटलच्या बांधकामाच्या परवानगीबाबत न.प. कार्यालयात नगर रचनाकार विभाग व बांधकाम विभागाकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तेथून कुठलीही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.


तर या कामाबाबतची कागदपत्रेच (अर्थपूर्ण) गहाळ झाली असल्याचे समजते. तेव्हा मलकापूर शहरात झालेल्या शांती आरोग्यम् हॉस्पीटलच्या बांधकामाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच या कामामध्ये सहभागी असलेल्या मलकापूर न.प.च्या संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांची सुध्दा तात्कळ चौकशी करण्यात यावी. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या ७ जानेवारी २०२५ पासून न.प. बांधकाम विभागात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अजय टप यांनी दिला आहे.

No comments

भालोद येथे विद्यार्थी सुरक्षा समितीने आयोजित केले कायदेविषयक...

नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी सर्व समाज बांधवानी मोठ्या संख्...

साकळी येथे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

विरावली येथे कृषिकन्यांनी साजरी केली लोकमान्य टिळक जयंती व व...

जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे लोकमान्य टिळक जयंती

मार्केटयार्ड चौकातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर...

स्मृतीगंध ७९ रिवाइंड" सिताराम सारडा विद्यालयाच्या १९७९ च्या ...

मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस रक्तदान कर...

उमर्टी ग्रामपंचायत येथे मोफत मोतीबिंदू शास्रक्रिया

घरफोडीतील 8 लाख 76 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत...